महाराष्ट्रसातारासामाजिक

सांस्कृतिक व सामाजिक बांधिलकी जपणारे जय दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ केळघर

२५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज – युवराज धुमाळ

केळघर.दि.०३.नवरात्र उत्सव २०२२ सांस्कृतिक उत्सवाच्या आयोजनातून सामाजिक बांधिलकी आणि एकता जपणारे मंडळ म्हणून ख्याती असणार्‍या जय दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ केळघर यांच्या वतीने यंदा 25 व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नेत्र चिकित्सा तपासणी करताना डॉक्टर


जय दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ केळघर यांच्या वतीने या वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, शुक्रवार ३०/०९/२०२ रोजी नेत्र तपासणी शिबीर, घेण्यात आले होते,त्यामध्ये मोतीबिंदू चिकित्सा तपासणी करून अल्पदरात वाटप चस्मे वाटप करण्यात आले.रात्री ८.३० वा.आरती,रात्री ९ वा जि.प.प्राथ.शाळा केळघर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आला.


तसेच शनिवार ०१/१०/२०२२रोजी जय दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ अक्षय ब्लड बँक सातारा यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, रक्तदानाचे महत्व लक्षात ठेवून या मंडळाच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हे महादान आहे.आजच्या युगात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे.या रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते हे लक्षात घेऊन ५० हून अधिक मंडळाच्या सदस्यांनी रक्तदान करून या मंडळाने यंदा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.


रक्तदानाचा कार्यक्रम पार पडले नंतर सायं ५ से ६.३० देवीचा गोंधळ दांडीयारास रात्री ८.३० वा.आरती, काल रविवार ०२/१०/२०२२ सकाळी ८.३० वा.आरती रात्री ८.३० वा. आरती,रात्री ९ वा ग्रुप डान्स स्पर्धा (आकर्षक बक्षीसे चपक),आज सोमवार ०३/१०/२०२२ दुपारी २ ते ८ वा होमहवन, महाप्रसाद दुपारी ४ ते ८ वा सुरसंगम कार्यक्रम (सुरेल संगीत कार्यक्रम)रात्री ९ वा सोलो डान्स स्पर्धांचे आयोजन,मंगळवार ०४/१०/२०२२सकाळी ८.३० वा. आरती देवीची महाआरती हळदी कुंकू कार्यक्रम बक्षीस वितरण (दांडीयारास),बुधवार ०५/१०/२०२२ सकाळी ८.३० वा. आरती दुपारी २ वाजेपासून संपूर्ण गावातून देवीची ढोल ताशांच्या गजरात भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या मंडळाच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या मंगलमय व भक्तिमय वातावरणात आपला आनंद द्विगुणित करावा असे आवाहन या मंडळाच्या वतीने अध्यक्ष.दिपक शामराव सल्लक उपाध्यक्ष.अमन आनंदा चव्हाण तसेच मंडळाचे संचालक व सर्व सदस्यांनी व्यक्त केले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!