शिवसेना शिव आरोग्य सेना,वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी स्मारक रुग्णालय,परेल येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप

मुंबई.दि.०२.शिवसेना शिव आरोग्य सेना, वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक ०२/१०/२०२२ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान घोषणेचे प्रणेते भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी स्मारक रुग्णालय,परेल या रुग्णालयाच्या आवारात असलेल्या महात्माजिंच्या अर्धपुतळ्याचे पुजन व शास्त्रीजी यांच्या तसबिरीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.

त्याप्रसंगी शिवआरोग्य सेनेचे व AIACPC चे महा.उपाध्यक्ष श्री.अमोल वंजारे,महा.सचिव श्री.अमित देशमुख,महा.महिला सचिव सौ.ज्योतीताई भोसले, शिवसेना संपर्कप्रमुख नागपूर ग्रा.चे श्री.अखिलेश काळे, हॉस्पिटल चे डॉ.प्रमोद वावळे,सौ.साधना बेलवलकर, सौ.स्नेहा पोजरी,श्री.प्रकाश सोनावने,शिव आ.सेनेचे व AIACPC चे ठाणे चिटणीस श्री.सचिन जोईजोडे,मुंबई सचिव श्री.हितेश गायकवाड,

सहसचिव श्री.दत्तराज आंब्रे,श्री.लीतेश केरकर, श्री.सुहास परब,शिवडी विधा.सचिव श्री.नंदकुमार बागवे,अंजली भोसले, श्री.संतोष सुर्वे,श्री.हरि शंकर शर्मा व सर्व सुरक्षा रक्षक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





