
युवराज धुमाळ
केळघर. दि.१८ जावली तालुक्यातील मेढा येथे तालुक्याच्या ठिकाणी फेब्रुवारी २०२० रोजी ५४ गावांचे अभुतपुर्व चक्काजाम आंदोलन झाले होते. त्याला आज दोन वर्ष झाली.एका महत्वाच्या सामाजिक प्रश्नावर ५४ गावे पहिल्यांदाच एकत्र आली होते. सकाळी १२ ते दुपारी ४ पर्यंत ४००० ते ५००० स्त्री पुरुषांचा जमाव भर उन्हात रस्त्यावर थांबून राहिला.
अधिक्षक अभियंता बापूसाहेब पवार यांनी सर्वांसमोर १ महिन्याच्या आत पोलीस बंदोबस्तात ट्रायल पिट करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र आश्वासन दिल्याप्रमाणे प्रशासनाने काहीही कार्यवाही केली नाही. जरी प्रशासनाने हे आंदोलन दडपण्यात तात्कालिक यश मिळवले असले तरी या आंदोलनामुळे धरण कृती समितीला आत्मविश्वास मिळाला.५४ गावच्या लोकांना धरण होणेबाबत किती आत्मियता आहे हे समजले. या आंदोलनामुळे वास्तविक धरणाचा प्रश्न सुटायला हवा होता. पण प्रशासनाचा हलगर्जीपणा व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे हा प्रश्न मागे पडला. त्यावेळी कृती सांगितले. समितीचा आंदोलनाबाबतचा अनुभवही कमी पडला असे माझे प्रामाणिक मत आहे.

डॉक्टर भारत पाटणकर यांचा पाणी प्रश्नाचा अभ्यास, चळवळींचा अनुभव, समन्यायी पाणी वाटप कायद्याचे जनक, बळीराजा धरणाची निर्मिती त्यामुळे बोंडारवाडी धरणाचा प्रश्न डॉक्टर भारत पाटणकर यांच्याकडे कृती समितीने पुर्ण विचारांती सोपवला आहे, असे विजयराव मोकाशी यांनी बोंडारवाडी धरणाची चळवळ आता निर्णायक टप्प्यात आलीअसून येत्या काही दिवसांत बोंडारवाडी धरणाला मंजूरी मिळाली नाही तर निर्णायक आंदोलन सुरू करण्यात येईल व धरण मंजूर होईपर्यंत ते आंदोलन चालूच राहील.




