राजकीयसातारा

प्रतापगड साखर कारखान्यायाची निवडणुक बिनविरोध व्हावी

मा.आ.सदाभाऊ सपकाळ तालुका संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, क्षेत्रप्रमुख एस एस पार्टे,तालुकाप्रमुख विश्वनाथ धनावडे, जावली बँकेचे माजी अध्यक्ष योगेश गोळे, सचिनजी करंजेकर आदी.

मेढा दि.१५.   प्रतापगड साखर कारखान्यायाची निवडणुक बिनविरोध व्हावी मात्र ज्यांनी संघटितपणे अर्ज दाखल केले आहेत त्यांनी कारखाना चालू करण्यासंदर्भात आपली भूमिका जाहीर करावी मग आम्ही त्यांच्या सोबत राहू सहकारात कारखाना चालवायला अडचण असेल तर आपल्या तालुक्यात अनेक मोठे उद्योजक आहेत त्यांना डावलून कै लालसिंगराव काकांच्या व कै राजुकाकांच्या विचारांना हरताळ फासून जर कारखाना तालुका सोडून बाहेरच्या माणसाच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही प्रखर विरोध करू असा इशारा माजी आमदार सदाशिवराव सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिला

प्रतापगड साखर कारखाना निवडणूकी संदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी तालुका संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, क्षेत्रप्रमुख एस एस पार्टे,तालुकाप्रमुख विश्वनाथ धनावडे, जावली बँकेचे माजी अध्यक्ष योगेश गोळे,माजी तालुकाप्रमुख संजय सुर्वे,, सरपंच विजय सपकाळ, वैजयंता पाडळे,अरुण जवळ,पांडुरंग संकपाळ,चंद्रकांत धनावडे, आदी मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार सदाशिव सपकाळ म्हणाले आदरणीय कै लालसिंगराव काकांचे सोनगावच्या माळावर साखर कारखाना व्हावा हे स्वप्न होते पण ते पूर्ण होत नव्हते युती शासनाच्या काळात मी आमदार असताना काकांनी मला मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना कारखान्याबाबत मदत करायला सांगा असे सांगितले आदरणीय काकांच्या शब्दाला मान देऊन मी त्यावेळी प्रतापगडच्या उभारणी साठी भरपूर मदत केली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी,सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्याकडे काकांना घेऊन अनेक बैठका घेतल्या व सर्व परवानग्या मिळवून दिल्या मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी या कारखान्यात अर्धे संचालक मंडळ माझ्या विचाराचे म्हणजे शिवसेनेचे व अर्धे संचालक काकांच्या विचाराचे घ्यावेत अशी अट घातली होती मात्र त्यावेळी मी त्यागाची भावना ठेवून सहकारी संस्था एकमुखी नेतृत्वाखाली चालल्या तरच टिकतात हे मी मुख्यमंत्री महोदयांना पटवून दिले व अर्धे संचालक माझे न भरता काकांनाच अधिकार दिले

कारखान्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला व कारखान्यात रोजगार देण्याचे मान्य करून कारखान्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न केले व प्रतापगड उभा राहिला त्यानंतर कै काकांनी मला क्षेत्र ओलिताखाली आले तरच कारखाना टिकेल यासाठी कुडाळ जवळ के टी बंधारा व महू ला धरण बांधण्यास सांगितले आदरणीय काकांची तीही मागणी मी मान्य करून महू- हातगेघर प्रकल्प व के टी बंधारा बांधला दरम्यान उसाच्या कमतरतेमुळे प्रतापगड बंद पडला व कर्जाच्या खाईत बुडाला त्यानंतर मी आमदार नव्हतो मात्र केंद्रात सरकार सेना भाजपचे होते आनंदराव अडसूळ अर्थ राज्य मंत्री होते कै लालसिंगराव काकांनी मला त्यांची भेट घडवून आणून कारखान्याला मदत करण्यास सांगितले माझ्या घरी अडसूळ साहेबाना बोलावून काकांची भेट घडवून आणली व कारखान्यासाठी मदतीचे आश्वासन मिळवून दिले या सर्व गोष्टीना काकांबरोबर उपस्थित कारखान्याचे अनेक संचालक साक्षीदार आहेत
आता निवडणुकीत ज्यांनी अर्ज भरलेत त्यांनी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा कसा राहील,तो चालू कसा करता येईल,किसनवीरचा करार रद्द कसा होईल,कारखाना चालू करण्यासाठी निधीची तरतूद कशी करणार याची उत्तरे २८ फेब्रुवारी पर्यंत द्यावीत केवळ पैसे उभे होत नाहीत म्हणून कारखाना जर खाजगी व्यक्तच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही प्रखर विरोध करू शेतकरी,सभासद यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी कारखाना बिनविरोध करण्यासाठी व चालू करण्यासाठी एकत्र यावे काकांच्या वारसांनी त्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी केली.


माझ्या ग्लुकोज कारखान्याचे काय ?

बऱ्याच लोकांना वाटत असेल की यांच्या ग्लुकोज कारखान्याचं काय झालं ? पण सदाशिव सपकाळ यांनी त्याबाबत ही खुलासा केला ते म्हणाले राज्यात तेरा ग्लुकोज कारखान्यांना परवानगी मिळाली आहे परंतु वेगवेगळ्या सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे सर्वच ग्लुकोज कारखाने रखडले आहेत मी जमा केलेले भागभांडवल व घेतलेली जमीन सुरक्षित आहे २०२१ पर्यंत लेखापरीक्षण झाले आहे परंतु काही सभासदांना शंका असेल व त्यांना शेअर्स परत घ्यायचा असेल तर त्यासाठी मी सहकार विभागाकडे परवानगी मागितली आहे ती मिळाली की ज्यांना पाहिजे त्यांना शेअर्स परत मिळेल कारखान्याला जिल्हा बँकेचे सभासदत्व मिळाले असल्याने त्या जमिनीवर छोटा प्रकल्प उभारण्यात येणार आहे माझा कारभार पारदर्शक असून मी पैशाचा लालची नाही असं सपकाळ यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!