
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मेढा. दि.२२ आपल्या न्याय हक्कासाठी आणि आपले राजकीय शैक्षणिक आरक्षण वाचविण्यासाठी राज्याचे मंत्री विजय वट्टेटीवार व OBC नेते कल्याणराव दळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे होणाऱ्या OBC VJNT बहुजन परीषदेला सातारा जिल्ह्यातील सर्व OBC व VJNT समाज बांधवांनी मोठ्या संख्येने राहावे असे आवाहन OBC समाजाचे जिल्हा समन्वयक आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सातारा जिल्हाध्यक्ष विजयराव सपकाळ यांनी केले आहे .

यावेळी विजयराव सपकाळ म्हणाले राज्यातील ओबीसी व्हीजेएनटी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी आणि राजकीय आरक्षणा पासून ते जात निहाय जणगणनेसाठी राज्यासह देशात उठाव करणारे या राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते विजय वट्टेडीवार व ओबीसी नेते कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी राज्य समन्वयक अरुण खरमाटे , संजय बापू विभुते यांच्यासह राज्यातील हजारो ओबीसी व्ही जे एन टी व एस बी सी नेते त्यांच्या शेकडो संघटना एकत्र येवून ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परीषदेची स्थापना ओबीसीचे नेते कल्याणराव दळे यांच्या प्रमुख उपस्थित आणि मंत्री विजय वट्टेटीवार यांच्या हस्ते उद्दघाटन होणार आहे .

हा तर इतर मागास ओबीसीच्या आणि व्हीजेएनटी या अतिशय मागास समाज्याचा सुवर्ण दिन आहे. छत्रपती शाहू महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर OBC समाज बांधवांच्या जीवनात या बहुजन परीषदेमुळे एक नविन पर्व ओबीसी सर्व अस संघटन मंत्री विजय वट्टेडीवार आणि कल्याणराव दळे यांच्या मुळे होणार आहे .
आपल्यावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटणार असून सर्वसामन्य समाज बांधवांना न्याय देणार हक्काच व्यासपीठ संघटन उभ राहात आहे . याच साक्षीदार होण्यासठी आपले आरक्षण वाचवण्यासाठी अभी नही तो कभी नही त्यामुळे मोठ्या संख्येन उपस्थित राहावे असे आवाहन OBC जिल्हा समन्वयक विजयराव सपकाळ यांनी केले आहे .




