
स्टार ११न्युज नेटवर्क
मेढा दि.२२ आपला देश हा कृषिप्रधान देश असून शेतकरी संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देण्यामध्ये गावपातळीवरील विकास सेवा सोसायट्यांचा मोलाचा वाटा असतो. करंजे विकास सेवा सोसायटी सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासेल, असा विश्वास आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
जावली तालुक्यातील करंजे विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. सोसायटीच्या चेअरमनपदी रामचंद्र धनावडे, व्हा. चेअरमनपदी संपत धनावडे तर संचालकपदी वसंत धनावडे, पांडुरंग धनावडे, महादेव धनावडे,अजित साखरे, अलका चिकणे,शांताबाई धनावडे, शर्मिला धनावडे, पांडुरंग ज.धनावडे यांची निवड झाली.आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकार भास्कर धनावडे, नामदेव धनावडे, पांडुरंग धनावडे गुरुजी, वसंतराव चिकणे, सुरेशराव गोळे, नवनाथ धनावडे, अरविंद धनावडे, सुरेश धनावडे, सखाराम धनावडे, विठ्ठल धनावडे, हणमंत भिलारे, दत्तात्रय धनावडे आदी उपस्थित होते.



