धार्मिकमहाराष्ट्रसातारा

प्रतापगडच्या पायथ्याशी कुंभरोशीत संत रोहिदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

  • स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संदिप गाडवे

महाबळेश्वर दि.०३ संत रोहिदास समाज फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या वतीने मा. आमदार श्री. मकरंद (आबा) पाटील, १०५ गाव समाजाचे अध्यक्ष मा. घनश्याम (आप्पा) संकपाळ, अखिल भारतीय रविदासीयाँ धर्म संघटनेचे अध्यक्ष संजयजी खामकर तसेच सभापती संजुबाबा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संत रोहिदास जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.                           कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराजांच्या      प्रतिमेची पासून झाली. महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम करणेत आला. महिलांनी पारंपरिक पोषाख परिधान करून कार्यक्रमाला शोभा आणली. तसेच भागातील आदर्श मातांचा राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दिप प्रज्वलन करून जि.प. प्राय. शाळा कुंभरोशी मधील मुलींनी स्वागत गित गायले. संत रोहिदास समाज फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री संपत धोंडिबा कदम यांनी महाबळेश्वर, जावली, वाई तालुक्यातील या समाजातील तरुणांना एकत्रित करून या संघटनेची स्थापना केली. मा. सुभाष सोनावणे यांनी संत रोहिदास महाराजांवर आधारीत व्याख्यान केले. आमदार मकरंद पाटील यांनी समाजाला शुभेच्छा देऊन आपके मनोगत व्यक् केले.

यावेळी या कार्यक्रमास घनश्याम (आप्पा) संकपाळ, सभापती, संजुबाबा गायकवाड, पं.स. सदस्य आनंदा उतेकर, कुंभरोशी गावच्या सरपंच सौ. कांचन सावंत, गणेश उतेकर सरपंच वानवली, डी.के जाधव सचिव, कोयना एज्युकेशन सोसा. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश नाना सावंत, शहराध्यक्ष रोहित देव आनंदा धनावडे सरपंच तापोळा, विशाल संकपाळ, बाळासाहेब पार्टे, सखाराम ढेबे,संत रोहिदास समाज फाऊंडेशनची पहिली शाखा विध्यानगर, कुंभरोशी येथे नामफलकाचे अनावरण अध्यक्ष संपत धोंडिबा कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी मश्वर ता. अध्यक्ष मंगेश कारंडे, वाई. महादेव खाडे, जावली ता. अध्यक्ष गणेश कारंडे उपस्थित होते, राजेश जाधव गवडी यांनी गायलेल्या पोवाडा आणि रोहिदास महाराजांच्या गीतांना उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला.जयंती कार्यक्रमासाठी नेहरू युवा मंडळ कुंभरोशी विद्यानगरमधील सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी वाई, जावली, मश्वर तालुक्यातील चर्मकार समाज बांधव मोठ्या प्रमाणात कुंभरोशी ग्रामस्थ उपस्थीत होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमिन अरंडे, बार्गावरान काऊंडे, संदिप कदम यांनी केले. कार्यक्रमाची माहिती श्री. संतोष कारंडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!