आरोग्य विषयीमहाराष्ट्रसातारा

शासनाच्या वतीने मेढा येथे आयोजीत केलेल्या शिबीरासाठी  प्रचंड गर्दी

स्टार ११महाराष्ट्र न्युज नेटवर्क

मेढा.दि.०२ सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली व जिल्हा परिषद सातारा यांचे संयुक्त विद्यमाने दि .०१व ०२ मार्च रोजी पंचायत समिती जावली (मेढा ), जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा मेढा याठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी यामध्ये , मुकबधीर, कर्णबधीर, अस्थिव्यंग, अंध , तसेच आज २ मार्च रोजी ६० वर्षावरील वृद्धांसाठी विविध तपासणी शिबीर आयोजीत केले होत. पहिल्या दिवसा प्रमाणेच आज दुसऱ्या दिवशी वृध्द व्यक्तींची शिबीरासाठी प्रचंड गर्दी झाली होती. या दोन दिवसाच्या शिबीरासाठी सर्व हणमंत पवार यांनी त्यांचे कुटूंबियांचे फार मोठे योगदान लाभले असल्याची माहिती गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी दिली.
दुसऱ्या दिवसाच्या शिबीरासाठी उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला,तहसिलदार जावली राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी रमेश काळे, सहाय्यक गटविकास अधिकारी भानुदास साळवे , सहायक प्रशासन अधिकारी बी .सी. , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . भगवानराव मोहिते , नायब तहसिलदार श्री. बैलकर, प्रकल्प अधिकारी , उप अभियंता बांधकाम, तालुका आरोग्य कर्मचारी, पशुसंवर्धन , ग्रामीण पाणीपुरवठा , ग्राम पंचायत, शिक्षण विभाग, ग्रामसेवक , विद्युत , टेलिफोन ३त्यादी विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते.
पहिल्या दिवसाच्या शिबीरासाठी हजारो लाभार्थी जावली तालुक्याच्या विविध गांवातून उपस्थति राहीले होते त्यापैकी विविध तपासण्या केल्यानंतर ६२८ लाभार्थी यांची निवड झाली असून डॉक्टरांनी शिफारस केल्या प्रमाणे आवश्यक साहित्य गांव गावच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दोन महिन्यानंतर मिळणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी दिली.
या शिबीरामध्ये डॉ. शुभम पवार,डॉ.कावेरी हवाळे, डॉ. तारा विश्वकर्मा,डॉ.श्रृषा कांबळे,डॉ.रोहिणी कारंडे, डॉ. राजकुमार यादव,डॉ.शामलजी यादव,डॉ.शैलेंद्र राणा,डॉ.गौरव राणा,डॉ . योगेंद्र,डॉ.शिवम,डॉ.मोनाली कावरे.डॉ.मयुरी गायकवाड यांनी शिबीरामध्ये कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने यासाठी पुर्व तपासणी व नौदणी तसेच ६० वर्षावरील वृध्द व्यक्तींच्या ही विविध तपासणी करून त्यांना आवश्यक लागणाऱ्या साहित्यांची यादी करुन ती पुढे पाठविण्यात आली.
दोन दिवसाच्या शिबीरासाठी तालुक्यातील मान्यवरांनी भेटी देवून शुभेच्छा दिल्या.. शिबीर यशस्वी करण्यासाठी मेढा. प्राथमिक शाळेचे मुख्याद्यापक , त्यांचे सहकारी , शिक्षक वृंद , अंगणवाडी पर्यवेक्षीका ,सेविका , मदतनिस , बांधकाम ,, ग्रामिण पाणीपुरवठा उपविभाग , ग्रामपंचायत विभाग , विस्तार अधिकारी ( सर्व ) , पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक , तलाठी, , आरोग्य विभाग सर्व . अधिकारी कर्मचारी वृंद , डाटा एंट्री ऑपरेटर , संग्राम कक्ष यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
सदरच्या दोन दिवसाच्या शिबीरासाठी सुमारे तीन हजार लोकांसाठी नाष्टा , चहा, व जेवणाचे पॅकेट हणमंत आण्णा पवार यांनी त्यांची कन्या शिल्पा हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत पुरवले होते . यामध्ये त्यांचे कुटूंबिय आशा पवार , जितेश पवार योगेश पवार ,चारुशीला पवार , राकेश पवार मनिषा पवार , सर्व राहाणार विरार पूर्व यांचे ही योगदान मोलाचे लाभले आहे. हणमंत पवार व त्यांचे कुटुंबियांनी कोरोना काळात सुमारे १० लाख रुपये किंमतीचे मेडीकल साहित्य मोफत वाटले असून त्यांच्या या योगदाना बद्ध ल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!