महाराष्ट्रराजकीयसातारा

सातारा जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते येत्या २६ मार्च ला सांगली येथे होणाऱ्या ओबीसी बहुजण परीषदेला जाणार

सातारा, दि २२: ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपलं आरक्षण वाचविण्यासाठी सातारा जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते येत्या २६ मार्च ला सांगली येथे होणाऱ्या ओबीसी बहुजण परीषदेला जाणार असल्याचा निर्धार ओबीसी बांधवांनी ओबीसी नेते कल्याणराव दळे यांच्या उपस्थित केला यावेळी ओबीसी नेते कल्याणराव दळे म्हणाले,

ओबीसीच्या संदर्भात आपण पावलोपावली जागृत राहीलं पाहीजे नाही तर आपलं अस्तीत्वच राहणार नाही . आज राजकीय आरक्षण घालवलं,उद्या शैक्षणिक जाईल, त्यानंतर नोकऱ्या जातील त्यामुळे हा ओबीसी समाजच अस्तित्वहीन होईल त्यामुळे आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रत्येक ओबीसीचे जात समुदाय एकत्र येवून ओबीसींनीच ओबीसीसाठी आपल्या न्याय हक्कासाठी उद्याच्या २६ मार्च रोजी सांगली येथे होणाऱ्या ओबीसी व्हीजेएनटी परीषदेच्या माध्यमातून आपल्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी नेते कल्याणराव दळे यांनी केले .
२६ मार्च रोजी सांगली येथे राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परिषदेच्या मेळाव्या संदर्भात सातारा जिल्ह्याचा झंझावाती दौरा केला . यामध्ये महाबळे
राज्याचे ओबीसी बहुजन नेते मा. कल्याणराव दळे साहेब यांचा सातारा जिल्ह्याचा झंझावाती दौऱ्याचा शुभारंभ महाबळेश्वर येथून झाला . त्यानंतर यावेळी ते बोलत होते .
यावेळी ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परिषद प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा एसबीसी संघर्ष समिति चे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रयजी चेचर यांनी मार्गदर्शन करताना ते म्हणाले. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन जेष्ठ नेते भाऊ दळवी, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, ओबीसी जिल्हा समन्वयक व महाराष्ट्र नाभिक महामडळाचे जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ ,
पश्चिम महाराष्ट्र संघटक संजय परदेशी, हरिदास जाधव महामंडळांचे जिल्हा सचिव अजय काशिद उपस्थित होते . महाबळेश्वर तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते २६ ता . सांगली येथे येतील असा विश्वास ओबीसी संघटनेचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अनिल लोहार यांनी व्यक्त केला . तसेच वाई येथे झालेल्या बैठकीत जेष्ठ नेते अशोकदादा सुर्यवंशी, महेशराव जाधव व रमेश जाधव यांनीही मोठ्या संख्येने सांगलीच्या मेळाव्याला उपस्थित राहू असे स्पष्ट केले . त्यानंतर पाचवड येथे वाई पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण यांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत सभापती संगीता चव्हाण व मोहनराव चव्हाण यांनी या अधिवेशनाला दहा पेक्षा अधिक गाड्या घेवून येवू असे स्पष्ट केले .
कुडाळ ता जावळी येथे रविंद्र पवार यांनी आम्हीही सर्वजन आमच्या न्याय हक्काच्या लढ्यात सहभागी होणार असल्याचे सांगीतले.मेढा येथे झालेल्या बैठकीत मोठ्या सख्येने ओबीसी समाज्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे मेढयाचे माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी सांगीतले . यानंतर वाठार स्टेशन ता . कोरगांवे येथे झालेल्या बैठकीत माजी पंचायत समिती सदस्य संजय माने व किशोर काशिद रमेश पवार यांनी कोरगांव तालुक्यातून ओबीसी समाज सांगलीमध्ये मोठ्या संख्येने येईल असे स्पष्ट केले .
त्यानंतर फलटण मध्ये झालेल्या बैठकीत जेष्ठ नेते बापुराव काशिद अंबादास दळवी, दशरथ फुले सुहास काशिद यांनी आम्ही जास्तीत जास्त संख्येने सांगलीत आमच्या न्याय हक्काच्या लढाईत येणार तर शंकरराव मर्दाने जयवंत साळुंखे यांनीही खंडाळा तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असे स्पष्ट केले . या दोऱ्याची सांगता उंब्रज येथे झाली . यावेळी जिल्ह्यातून आम्ही हजारो संख्येने ओबीसी परीषदेला सांगलीत जाण्याचा निर्धार केला . यावेळी बारा बलुतदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव पवार, शशिकांत आमने , श्रीकांत आंबेकर चंद्रकांत जगताप सुनिता दिक्षीत भानुदास वास्के सदाभाऊ सपकाळ दशरथ महाराज जाधव यांनी मार्गदर्शन केले .प्रमोद क्षिरसागर यांनी आभार मानले .
संभाजी माने संजय पोतदार राजेंद्र चव्हाण गणेश सावंत संभाजी काशिद आदी उपस्थित होते.

विजय सपकाळ सातारा जिल्हा ओबीसी समन्वयक

     ओबीसी आरक्षणाचा अजून लढा संपलेला नाही, आता आपल्या अस्तित्वाची सुरु झाली आहे जो पर्यंत न्याय हक्क आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आम्ही लढत राहणार . आमच्या न्याय हक्कासाठी सांगलीला मोठ्या संख्येने जाणार आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!