
स्टार ११ महाराष्ट्र
सातारा दि.१८. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड / वृक्ष लागवड व फुलपीक लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आहे.

शासना निर्णयानुसार अर्जुन,असान,अशोका,बेहडा,हिरडा, बेल, टेटू, डिकेमाली, रक्तचंदन, रिठा, लोध्रा, आइन, शिवन, गुग्गुळ, बिब्बा व करंज या १६ वृक्ष वर्गीय औषधी वनस्पतींना अनुदान अनुज्ञेय आहे.

औषधी व सुगंधी वनस्पती लागवड करू इच्छिणाऱ्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in यावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.