सातारासामाजिक

तापोळा-महाबळेश्वर रस्ता बंद असल्याने वाहन चालकांनी
मांघर पारुट मार्गे झोळाची खिंड मार्गाचा वापर करावा
– तहसीलदार तेजस्वीनी पाटील

स्टार ११ महाराष्ट्र


सातारा दि.१९. तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर झोळखिंड हद्दीत वन विभागाच्या हद्दीत महारोळा खालच्या बाजूस नवीन पाणीप्रहाव निर्माण झाला आहे. तसेच याच लांबीत मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्यामळे व नवीन तयार झालेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे 40 मी लांबी व 5 मी रुंदीचा
नवीन डांबरी रस्ता रस्ता खचला व वाहून गेला आहे. तरी वाहन चालकांनी मांघर पारुट मार्गे झोळाची खिंड या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्वीनी पाटील यांनी केले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तीन जेसीबी लावून खड्डा बुजवण्याचे काम प्रगतीत आहे. परंतु मोठ्या प्रमाणावरील पावसामुळे या कामात अडथळा निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर लँड स्लाईड होत असल्यामुळे कुठलाही अपघात होऊ नये, या हेतूने मांघर पारुट मार्गे झोळाची खिंड अशी वाहतूक वळविण्यात आली आहे.

या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनी काळजी घ्यावी, घाबरू नये असेही आवाहन श्रीमती पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!