क्राईममहाराष्ट्र

सातारा जिल्हयातील अवैध व्यवसाय करणाऱ्या टोळीस सातारा पोलीसांनी केले तडीपार

 

स्टार ११ महारष्ट्र न्युज प्रतिनिधी ——-

सातारा.दि.०६.    सातारा जिल्हयामध्ये जावली, वाई तालुक्यातील जुगार मटका, चोरटी दारू विक्री सातत्याने गुन्हे कारणारे टोळी प्रमुख १) दिपक शामराव वारागडे, वय ४८ वर्षे, रा कुडाळ, ता जावली जि सातारा (टोळी सदस्य) २) महेश रामचंद्र जाधव, वय ३९ वर्षे, रा. कुडाळ, ता जावली जि सातारा यांचेवर सातारा जिल्हयामध्ये अवैध जुगार मटका चालविणे, बेकायदा दारुची चोरटी विक्री करणेबाबत गुन्हे दाखल असल्याने भुईंज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा जिल्हयातून तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी केली होती.

यातील टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांना अटक व कायदेशिर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर इगला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसून ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांचेवर कायदयाचा कोणताच पाक न राहील्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

वरील टोळीला मा.समीर शेख, हदपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सातारा जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

नोव्हेंबर २०१२ पासून १० उपद्रवी टोळयांमधील २६ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक, सातारा श्री बापू बांगर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोना प्रमोद सावंत, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!