क्राईमसातारा

थर्टी फर्स्ट डिसेंबरला जावलीत पोलिसांची करडी नजर

स्टार ११ महाराष्ट्र

केळघर.दि.३० नववर्ष स्वागताच्या निमित्ताने थर्टी फर्स्टच्या रात्री  पार्टीमध्ये हजेरी लावणारे तळीराम दारूच्या नशेत गाडी चालवून अपघातांस कारणीभूत ठरतात. त्यामुळे नशेत वाहन चालवणाऱ्यांच्या जिवावरही बेतू शकते.यासाठी जावलीत ठिकठिकाणी पोलिसांची करडी नजर राहणार असून पोलिसांचे विशेष फिरते पथक करण्यात आले असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी माहिती दिली.

या पार्श्वभूमीवर मेढा पोलिसांनी काही कडक पावले उचलली आहेत.थर्टी फर्स्टच्या रात्री दारू पिऊन घरी परतण्यासाठी स्वतः वाहन चालवू नयेत तसेच करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना पोलिसांकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. पार्टी आयोजित करताना निमंत्रितांना अथवा यात सहभागी होणाऱ्या मद्यपी ग्राहकांना प्रवेश देऊ नये.अशी तंबीच पोलिसांनी हॉटेल मालकांना नोटीसीद्वारे दिली आहे.

तालुक्यातील बंगला मालक व हॉटेल मालकांना लाऊड स्पीकर,डीजे लावण्यास बंदी केली असून विना परवाना स्पीकर लावून धिंगाणा करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात असल्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत,अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.

मेढा येथे पोलिसांचे विशेष पथक तैनात

अवैध दारू वाहतूक व दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर थर्टी फ़र्स्टच्या रात्री पोलिसांची करडी नजर राहणार आहे.शहरातील प्रमुख ठिकाणी श्वासविश्लेषक यंत्राद्वारे पोलिसांची तपासणी पथके तैनात करण्यात येणार आहेत.  तालुक्यात ठिक ठिकाणी पोलिसांचे पथक फिरणार असून हे पथक श्वास विश्लेषक यंत्राद्वारे मद्यपी तपासणी करणार आहे. याशिवाय, करहर कुडाळ मेढा कास बामणोली केळघर परिसरात होणाऱ्या विनापरवाना पार्ट्यावर देखील पोलिसांची करडी नजर राहणार असून यासाठी मेढा पोलिसांचे विशेष पथक तैनात राहणार आहे.

अवैध वाहतूक वाहन तपासणी करणार

मेढा,कुडाळ,करहर,केळघर,येथे मेढा पोलिसांचे विशेष फिरते पथक व नाकाबंदी करणार असून वाहन व चालकांची कसून तपासणी करणार आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!