
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——- प्रतिनिधी संतोष मालुसरे
तापोळा.दि.०५.गोगवे (तालुका महाबळेश्वर) येथील विकास सेवा सोसायटीचे सचिव सोपान सकपाळ याच्यावर लाखवड येथे दोन अज्ञात व्यक्तींनी चाकुने प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार झाल्याने कोयना विभागात ऐकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी बाराच्या सुमारास सोपान सकपाळ हे आपल्या घरातून गोगवे सोसायटीमध्ये आपल्या कार्यालयाकडे कामासाठी जात होते. अचानक त्यांना दोन अज्ञात व्यक्तींनी गाडी थांबवण्यास सांगितली. गाडी थांबताच तोंडाला बांधलेल्या अवस्थेत असणाऱ्या दोघांनी ‘ आप आमदार साब के साथ क्यू गये ?’ असे विचारले त्यास सोपान यांनी आपको क्या करणेगा है मी किसके साथ जाऊ असे उत्तर देताच दोघांनी उलट सुलट धमकी देऊन गाडीतून बाहेर ओढले व मारण्यास सुरुवात केली. हातातील चाकूने दोघांनी ही सोपान वर हल्ला चढवला. सोपांनवर चाकूने प्राणघातक हल्ला केला यावेळी गोंधळ होताच हल्लेखोर पसार झाले. संबंधित अज्ञात व्यक्तींकडे गाडी नव्हती.
हल्ला करुन हल्लेखोर पसार झाल्याची बातमी कोयना विभागात वाऱ्यासारखी पसरली लागलीच नागरिकांनी सोपान संकपाळ यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक श्री. नलावडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार गोगवे येथे पोलीस दाखल झाले. या हल्ल्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. पुढील उपचारासाठी सोपान संकपाळ यांना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल केले आहे. लवकरात लवकर या घटनेतील आरोपी पकडुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी या विभागातील जनतेने मागणी केली आहे.