राजकीयसातारा

कुसुंबी गणातून उमेदवारी मिळाली तर जावळीतील महिला सक्षमीकरण व महिलांना संरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार .. शितलताई धनावडे

स्टार ११ महाराष्ट्र

जावळी तालुक्यातील कुसुंबी गणातून पंचायत समितीसाठी सौ. शितल शाम बाबा धनावडे यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळावी,

केळघर.दि.१७.  जिल्हा परिषद पंचायत समिती होणारी निवडणुक जावली तालुक्यात कुसुंबी गणातून करंजे येथील शाम बाबा धनावडे यांच्या पत्नी सौ.शितल ताई धनावडे यांना भारतीय जनता पक्षाचे वतीने उमेदवारी मिळावी यासाठी करंजे येथील भाजप कार्यकर्ते,ग्रामस्थ तरुण युवक तसेच महिलांच्या वतीने मागणी जोर धरू लागली आहे.

ना.छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना जावली तालुक्यात श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे भोसले महिला मंडळाची स्थापना करून वेगवेगळ्या सामाजिक समाज उपयोगी व लोकाभिमुख योजना राबविल्या महिला सक्षमीकरण व महिला संरक्षण या क्षेत्रात छत्रपती शासन महिला सुरक्षा समितीच्या माध्यमातून शितल ताई यांनी खूप मोठे काम केले आहे.


शाम बाबा धनावडे आणि शितल ताई धनावडे यांचा कुसुंबी गणातील जनसंपर्क खरोखरच कौतुकास्पद मानला जातो. या भागात त्यांनी केलेल्या कामामुळे आणि लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी जनमानसात एक अढळ स्थान निर्माण केले आहे.

करंजे परिसरातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते शाम बाबा धनावडे यांच्या पत्नी सौ. शितल ताई धनावडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी निवडणुकीसाठी आपली प्रबळ दावेदारी सादर केली आहे. करंजे आणि आसपासच्या परिसरातील महिलांचे संघटन यामुळे त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

साध्या व सुसंस्कृत व आदरयुक्त स्वभावामुळे लोकमानसात विशेषत महीलावर्गामध्ये श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे भोसले यांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचे काम श्री.छ. वेदांतिकाराजे महिला मंडळाच्या माध्यमातून त्या करतात आणि एक सुशिक्षित व प्रामाणिक चेहरा हा जावळीच्या विकासाचा कुसुंबी गणातील सर्व गावांपर्यंत मूलभूत सुविधा पोहचविण्याचे काम शितल ताई नक्कीच करतील अशी अपेक्षा लोकातून व्यक्त होत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!