स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मेढा दि.३१.आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा ता. जावली, जि. सातारा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संस्थेच्या सातारा सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी कांचन बहेनजी यांनी रस्ते सुरक्षा व जीवन सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे, साथी ब्रह्मकुमारी उज्वला बेहेनजी, ब्रह्मकुमारी धनश्री बहेनजी, विद्यार्थिनी शितल जवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी असे प्रतिपादन केले की, विद्यार्थ्यांनी रस्त्यावरून वाहने चालवताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्याच व वाहन परवाना असलेल्या विद्यार्थ्यांनी वाहन चालवणे आवश्यक आहे. रस्त्यावरून पायी चालताना वाहनांच्या विरुद्ध दिशेने चालणे आवश्यक आहे, म्हणजे त्या वाहनांवर आपले लक्ष राहते. जिवंत असणे हे कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचे आहे. वाहन चालवताना जर आपल्या जीवाचे बरे वाईट झाले तर आपल्याबरोबर आपले पालक, नातेवाईक यांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. यासाठी रस्त्यावरून वाहन चालवत असताना मानसिक आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचा आहे. संत महंतांचे विचार जोपासावेत व त्या विचारांचा अंगीकार करावा. समाज स्वस्तासाठी धार्मिक विचारांची जोपासना करावी म्हणजे आपले विचार प्रगल्भ होतात. वाईट विचार मनामध्ये येत नाहीत. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यांचा त्याग केला पाहिजे, कालानुरूप गोष्टींचा स्वीकार करून जीवनात बदल घडवून आणला पाहिजे. यावेळी त्यांनी ययाती कादंबरीचा दाखला दिला. जीवन प्रवासात नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. जीवनाचा अनुभव घेण्यासाठी जिवंत असणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य चांगले असेल तर जीवनाचा उपभोग घेता येतो.

तर ब्रह्मकुमारी कांचन बेहेनजी यांनी असे प्रतिपादन केले की, कायदा हा आपल्या भल्यासाठी असतो. कायद्याचे पालन करून वाहन चालवले पाहिजे वाहन चालवताना चूक झाली तर माफी मिळत नाही. वाहनाचे नुकसान होते व आपणालाही त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्याच पद्धतीने जीवन प्रवासात शरीर रुपी गाडी चालवण्यासाठी संयम महत्त्वाचा आहे. संयम नाही ठेवला तर जीवनाचा आघात होतो. त्यामुळे सर्व कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो. जीवन प्रवासात संयम महत्त्वाचा आहे. प्रवासात काय बरोबर घ्यायचे काही नाही याचाही विचार केला पाहिजे चांगले विचारांची जोपासना करून जीवनाचा प्रवास केला तर आपणाला कोणत्याही अपघातास सामोरे जावे लागत नाही. तोंडात गोड शब्दांचा साठा असला पाहिजे, प्रेमाची भाषा वापरली पाहिजे, दुसऱ्याकडून घेण्यापेक्षा त्याला स्नेह प्रेम, गोडवानी, चांगले विचार देता आले पाहिजेत. वाहन चालवताना जसे गाडीचे स्पीड जास्त असेल तर अपघात होतात. जीवनातही विचारांचा गोंधळ असेल तर अपघात होतात चांगल्या विचारांची जोपासना केली तर रस्त्यावर वाहन चालवताना व जीवन प्रवासात अपघात होणार नाहीत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय भोसले यांनी तर आभार प्रा.संतोष कदम यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. संजय प्रा. सौ. संध्या पोळ, प्रा. सौ. सुषमा काळे, प्रा. सौ. ज्योती कदम, प्रा. सौ. स्वाती दाभाडे, प्रा. सौ. रोहिणी खंदारे, प्रा.सौ.सुप्रिया पाटील प्रा. तेजस जाधव यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा ता. जावली, जि. सातारा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संस्थेच्या सातारा सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी कांचन बहेनजी यांनी रस्ते सुरक्षा व जीवन सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे, साथी ब्रह्मकुमारी उज्वला बेहेनजी, ब्रह्मकुमारी धनश्री बहेनजी, विद्यार्थिनी शितल जवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी असे प्रतिपादन केले की, विद्यार्थ्यांनी रस्त्यावरून वाहने चालवताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्याच व वाहन परवाना असलेल्या विद्यार्थ्यांनी वाहन चालवणे आवश्यक आहे. रस्त्यावरून पायी चालताना वाहनांच्या विरुद्ध दिशेने चालणे आवश्यक आहे, म्हणजे त्या वाहनांवर आपले लक्ष राहते. जिवंत असणे हे कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचे आहे. वाहन चालवताना जर आपल्या जीवाचे बरे वाईट झाले तर आपल्याबरोबर आपले पालक, नातेवाईक यांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. यासाठी रस्त्यावरून वाहन चालवत असताना मानसिक आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचा आहे. संत महंतांचे विचार जोपासावेत व त्या विचारांचा अंगीकार करावा. समाज स्वस्तासाठी धार्मिक विचारांची जोपासना करावी म्हणजे आपले विचार प्रगल्भ होतात. वाईट विचार मनामध्ये येत नाहीत. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यांचा त्याग केला पाहिजे, कालानुरूप गोष्टींचा स्वीकार करून जीवनात बदल घडवून आणला पाहिजे. यावेळी त्यांनी ययाती कादंबरीचा दाखला दिला. जीवन प्रवासात नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. जीवनाचा अनुभव घेण्यासाठी जिवंत असणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य चांगले असेल तर जीवनाचा उपभोग घेता येतो.