
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी संजय वांगडे
कुसुंबी.दि.१५. जिल्हा स्तरीय व तालुकास्तरीय पुढारी टॅलेट सर्च एक्झाम स्पर्धेत कुसुंबी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अनुष्का सोमनाथ जाधव इयत्ता ४थी तिल विद्यार्थिनी जिल्हयात ५ वी व जावली तालुक्यात प्रथम आली.इ ५ वीतील विद्यार्थिनी दिव्या कुलदीप वेंदे तालुक्यात पहिली, व इ ५ वीतील जान्हवी दिपक कदम तालुक्यात २ री,इ ७ वीतील अक्षरा जनार्दन गुरव ही तालुक्यात पहिली,इ ७ वीतील तन्वी किशोर लोहार ही तालुक्यात दुसरी आली.
या सर्व विद्यार्थ्यांना पौर्णिमा खाडे, प्रकाश धनावडे , राजेश धनावडे,वर्षा धनावडे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गट)जावली तालुका अध्यक्ष साधू चिकणे, गटशिक्षणाधिकारी श्री संजय धुमाळ,विस्तार अधिकारी कर्णे साहेब,केंद्रप्रमुख विजयकुमार देशमुख,सरपंच मारुती चिकने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष चौधरी ,उपाध्यक्ष संदीप साळुंखे उपसरपंच निवृत्ती मोरे पोलिस पाटील एकनाथ सुतार,माजी सरपंच जगन्नाथ चिकने,पुष्पाताई चिकने ग्रामस्थ कुसुंबी,यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.