आसनीतळ येथे साईमंदिराच्या उद्घाटन प्रसंगी शशिकांत शिंदे , राजेंद्र . धनावडे , संतोष शेलार , शैलेश शेलार , राम भिलारे आदि .
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
केळघर.२२.दि. सध्याच्या काळात माणसाला अनेक अडचणींना व समस्यांना सामोरे जावे लागते. संकटापासून दिलासा देण्याचे काम ईश्वर भक्तिमधून होते.धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनामुळे समाजामध्ये एकोपा वाढत असून साई मंदिराच्या निर्माणामुळे परिसरात धार्मिक वातावरण वाढीस लागून अध्यात्मिक परंपरा जोपासण्याचे काम वाढीस लागेल,असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण प्रसंगी मंहत हेमंतपूरी महाराज.
आसनीतळ (साईनगर ) ता . जावली येथील ॐ साईराम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . यावेळी युवा नेते साहिल शिंदे ,युवा उद्योजक व साईनाथ मिञ मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र धनावडे , सुनिल देशमुख , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बाजीराव धनावडे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आतिश कदम , दिपक कदम , खादी ग्रामोद्दोचे राम कदम , संजय जुनघरे आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी साईबाबा मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण रामदरा ( शिवालय ) मठाचे महंत हेमंतपूरी महाराज यांच्या हस्ते झाले . तर धार्मिक विधी महेश स्वामी , वैभव जंगम आदिंनी केले . यावेळी जुगल किशोरजी यांचे प्रवचन, साई भजन झाले .
दरम्यान बोडारवाडी धरण कृती समितीचे निमंञक विजयराव मोकाशी , जावली पंचायत समितीच्या माजी सभापती सौ जयश्रीताई गिरी , शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख एस एस पार्टे गुरुजी , संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे , तालुका प्रमुख विश्वनाथ धनावडे ,युवा उद्योजक विजय सावले , सुरेश वाडकर , सुर्यकांत रांजणे , सतीश पार्टे , संतोष कदम आदि उपस्थित होते . सूञसंचालन सरपंच संतोष शेलार व शामराव जुनघरे यांनी केले . तर आभार संतोष बापू शेलार यांनी मानले.