महाराष्ट्रसातारासामाजिक

बोंडारवाडी धरणाचे काम पूर्ण करा अन्यथा कण्हेर आणि उरमोडी धरणाचे पाणी अडवणार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा राज्यसरकरला इशारा

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ

केळघर.दि.२८.  जावली तालुक्यातील बोंडारवाडी धरण पूर्ण करून जावळीच्या ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न कायमचा सोडवावा अन्यथा येत्या दहा दिवसात साताऱ्यातील कण्हेर आणि उरमोडी धरणाचे पाणी अडवणार असल्याचा इशारा सातारा जावली चे आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्य सरकारला दिला आहे.
जावली तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी धरणाची उभारणी करण्यात आली मात्र त्याचे काम गेली कित्येकवर्षं झाली रखडले आहे त्यामुळे जावली तालुक्यातील पाणीप्रश्न अद्यापि सुटलेला नाही त्यासाठी वारंवार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठपुरावा करून राज्य सरकरला निवेदने दिली आहेत तरी देखील बोंडारवाडी धरणाचे काम सुरू होत नसल्याने आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
जिल्हा प्रशासन व राज्य सरकारने दहा दिवसात कि मागणी पूर्ण न केल्यास पुढील काळामध्ये झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी कण्हेर आणि उरमोडी धरणाचे पाणी अडवले जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळेला बोलताना दिला आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!