वृक्ष चळवळ गावागावात पोहोचवणे काळाची गरज सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
सातारा. दि.२८. पर्यावरणाचा हास रोखण्यासाठी, निसर्गाचा समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. निसर्गाचा समतोल बिघडला तर हवामानावर परिणाम होऊन विविध संकटांना सामोरे जावे लागेल. वृक्ष चळवळ वाढवणे व गावागावात पोहचवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अभिनेते व सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी केले.
कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात वृक्षचळवळीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले, सह्याद्री देवराईचे जिल्हा प्रमुख विजय निंबाळकर, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, नायब तहसीलदार सारिका शिंदे, नायब सहाय्यक गटविकास अधिकारी सपना जाधव, संजय शेडगे, जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे सचिव अभिजित चव्हाण निलेश बर्गे, कृषीपदवीधर संघटनेचे अध्यक्ष धनंजय सस्ते व मान्यवर उपस्थित होते. सयाजी शिंदे म्हणाले सह्याद्री देवराई प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवड
नियोजनासाठी बैठकीत ग्रामपंचायतींनी वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न मिळवून देणारी वृक्ष लागवड करून आर्थिक उन्नती साधावी लोकझाडे लावतात.परंतु संवर्धनाकडे लक्ष देत नाहीत ग्रामपंचायत यांनी दोन वर्षाच्या पुढील झाडांची निवड करून त्यांचे संवर्धन करावे त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडेल व ऑक्सिजनचे प्रमाणही वाढेल वृक्ष लागवड व संवर्धनासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल.



