ज्योती लघु चित्रपटातील प्रतीक्षा बगाडेला उत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ——–
मेढा.दि.२१ जावली तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील कलाकारांनी आपल्या मातीचा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कलागुणांनी व कौशल्याने आपला ठसा उमटवला आहे .तालुक्यातील छोट्याशा बेलावडे गावातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) जिल्हा सचिव किरण बगाडे यांची छोटी कन्या प्रतीक्षा बगाडे चे अखेर स्वप्न पूर्ण झाले.
2020मधील जुलै महिन्या मध्ये प्रतीक्षाच्या आईचे निधन झाल्यानंतर त्या दुःखातून नुकतीच सावरताच,आखाडे व वालुथ या गावांमध्ये अभिजीत भोसले व रोहन भोसले यांच्या सहकार्यामुळे वृंदावन फिल्म प्रोडक्शन च्या माध्यमातून रविराज ओवाळे व अंकिता मॅडम यांच्या मार्गदर्शना मधून वृंदावन फिल्म प्रोडक्शन च्या वतीने ज्योती नावाच्या लघु चित्रपटाची शूटिंग करण्यात आली होती. या लघु चित्रपटांमध्ये प्रतीक्षा किरण बगाडे हिची प्रमुख भूमिका होती प्रतीक्षा हिला भंडारी सर रविराज ओव्हाळ सर अंकिता मॅडम राजू गोसावी सर अभिजीत भोसले रोहन भोसले विकी कांबळे या लोकांनी खूप मार्गदर्शन केले या मार्गदर्शनाच्या माध्यमातूनच ती काम अभिनय करत होती.कॅमेरासमोर अभिनय करू लागली अभिनय करत असताना शूटिंग दरम्यान ती सायकलीवरून पडल्याने पायाला दुखापती झाली मात्र तिने जिद्द सोडली नाही ज्योती,लघु चित्रपटांमध्ये शोषित पीडित अतिदुर्गम व परिस्थितीतून खचलेल्या मुलीच्या शिक्षणाची व्यथा मांडली आहे त्यामुळे या गरीब कुटुंबातील मुलीला शिक्षणाची इच्छा असूनही परिस्थिती पुढे नतमस्तक व्हावे लागते याच शिक्षणाची व्यथा या ज्योती लघु चित्रपटांमध्ये रविराज ओवाळे व राजू गोसावी यांनी मांडले आहे.
या चित्रपटांमध्ये अनेक कलाकारांनी अभिनय केला आहे काही दिवसापूर्वी या चित्रपटाला मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवार्ड तसेच TIFF तमिल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवार्ड या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते कालच महाबळेश्वर या ठिकाणी वृंदावन फिल्म प्रोडक्शन च्या ज्योती चित्रपटाला ड्रीम हिरो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2023 या पुरस्काराने प्रमुख भूमिकेत असणारी बालकलाकार प्रतीक्षा किरण बगाडे हिला सन्मानित करण्यात आले या चित्रपटासाठी भंडारी सर रविराज ओवाळे सर अंकिता मॅडम राजू गोसावी अभिजीत भोसले, रोहन भोसले, किरण बगाडे,यांनी खूप परिश्रम घेतले आहेत.
प्रतीक्षाला विविध पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे चित्रपट सृष्टी मधील दिग्दर्शक,कलाकार,नवोदित कलाकार यांनीही प्रतीक्षाला शुभेच्छा दिल्या,तसेच राजकुमार भोसले (महाराज)यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आयु.दादासाहेब ओव्हाळ यांनी प्रतिक्षाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजकुमार भोसले महाराज,चंद्रशेखर पोपळे राम गायकवाड,रिपाई(A)चे जिल्हा सचिव किरण बगाडे उद्योजक गणेश निकम रोहन भोसले अभिजीत भोसले अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शिंदे दिग्दर्शक अमित कांबळे व विविध लघु चित्रपटांमधील नवोदित कलाकार दिग्दर्शक निर्माते कथा पटकथा मांडणारे अनेक दिग्दर्शक व निर्माते व बालकलाकार या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते तसेच रोहन भोसले यांनी कार्यक्रमास उपस्तितथ असणाऱ्यांचेआभार मानले.