
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ——
मेढा. दि.२१ . आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यासाठी महाविद्यालयातील प्राचार्य ,उपप्राचार्य ,प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात योगा विषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करण्यासाठी योग अंबिका कुटीर संस्था ठाणे शाखा सातारा येथून योगशिक्षक श्री विठ्ठल अभंग सर व योगशिक्षक श्री उमेश राऊत सर यांनी प्रोटोकॉल प्रमाणे योगाचे योग्य प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिक करून दाखवली व करून घेतली.कार्यक्रमास सर्वांनीच अतिशय उत्कृष्टपणे सहभाग नोंदवला
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख प्राध्यापक प्रमोद चव्हाण यांनी केले अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी सर व प्रमुख उपस्थितीत डॉ.उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे हे होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. संतोष कदम सर यांनी मांडले अशाप्रकारे 21 जून 2023 हा आंतरराष्ट्रीय योग दिवस महाविद्यालयात साजरा करण्यात आला.