
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ——–
बामणोली.दि. २६. नवतरुण मित्र मंडळ साईनगर (दंड वस्ती) यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले.
बामणोली विभाग म्हंटले की दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. आणि पावसाळ्यात या विभागामध्ये पावसाचे प्रमाणावर जास्त असते. आणि मुलांना भिजत शाळेत यावे लागते. या उददेशाने नवतरुण मित्र मंडळ साईनगर (दंड वस्ती) बामणोली यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणोली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पावशेवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हावशी तसेच रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बामणोली शाळेतील मुलांना छत्रीचे वाटप केले.
या उपक्रमातुन सामाजिक बांधिलकी जपण्याची काम नवतरुण मित्र मंडळ साईनगर (दंड वस्ती) बामणोली यांनी केली. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक विभागामध्ये होत आहे. त्यावेळी नवंतरुण मंडळाचे अध्यक्ष शिवराज पवार, उपाध्यक्ष रितेश पवार ,सचिव विशाल पवार , खजिनदार विकास पवार , सदस्य निलेश पालकर,संकेत जांभळे, स्वप्निल जांभळे, राम जाधव व मंदार जाधव उपस्थित होते.