संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात म्हाते खुर्द गावाने पटकविला जिल्ह्यात दुसरा क्रमांक
स्टार ११ महाराष्ट न्यूज प्रतिनिधी ——
मेढा . दि.२५, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात म्हाते खुर्द गावाने सातारा जिल्ह्यात पटकविला दुसरा क्रमांक सातारा जिल्ह्यातील मौजे म्हाते खुर्द या गावाने महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सातारा जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकविला असुन या जिल्हास्तरीय यशानंतर म्हाते खुर्द गाव पुणे विभागीय तपासणीसाठी सज्ज झाले आहे.
म्हाते खुर्द गावाने महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात देखील जावली तालुक्यात अव्वल स्थानी राहुन राज्यात सोळाव्या क्रमांकाचे मानांकन मिळविण्याचा बहुमान पटकाविला होता.सातारा जिल्ह्यात पाणीदार गाव म्हणून ओळखल्या जाणा-या म्हाते खुर्द गावच्या लौकिकात या यशस्वी कामगिरीमुळे आणखी एका वैभवाची भर पडली आहे.पर्यावरण संवर्धनासाठी निसर्गाच्या पंचतत्वावर आधारित म्हाते खुर्द गावाने कृतीशील पध्दतीने या अभियानात भाग घेऊन ग्रामस्थांच्या अमुल्य सहभागातून हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.जलसंधारण,शेततळी,सार्वजनिक विहीर,दोन पुल निर्मित रस्ते,ग्रामपंचायत कार्यालय व सांस्कृतिक भवन इमारत,शाळा इमारत,स्मशानभुमी सुशोभिकरण,झरे बळकटीकरण नविन झ-यांची निर्मिती,घरोघरी नळ विस्तार इत्यांदी विकास कामांचा यामध्ये समावेश आहे.
म्हाते खुर्द या गावाने गावच्या डोंगरमाथ्यावर स्वेच्छानिधीतुन १५० × १०० फुट आयताकृती आकाराचे ३० फुट खोलीचे व ६० लाख लीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या शेततळ्याची निर्मिती करुन जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.रेन वाँटर हारवेस्टींग व परकोलेशनचा देखील प्रयोग या गावाने राबविण्याचा प्रयत्न केला आहे.सौरउर्जेवर चालणारे एलईडी दिव्यांची निर्मिती केली गेली आहे.वृक्षारोपनाच्या माध्यमातून हरित आच्छादन वाढविण्यासाठी भर दिला गेला आहे.या अभियानाच्या माध्यमातून गावच्या सौंदर्यात व सुशोभीकरणात परिणामकारक बदल झाला आहे.हागंणदरी मुक्त गाव,तंटामुक्त सोबतच विद्या मंदिरही आयएसओ मानांकन करून शाळेला ‘अ’ दर्जा श्रेणी प्राप्त आहे.रोजगार हमी सारखा कायदा भारत सरकारने निर्माण केला. आर्थिक सुबत्ता समानतेसाठी रोजगार हमी सारख्या योजनेसाठी म्हाते खुर्द गाव सातारा जिल्ह्यातील माँडेल गाव म्हणून नावारूपाला आले आहे.
म्हाते खुर्द गावच्या या विकसनशील वाटचालीत सातारा जावली विधानसभेचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. म्हाते खुर्द गावच्या या यशात ग्रामस्थ मंडळ, नवयुग विकास मंडळ,नवयुग विकास पतपेढी,नेहरु युवा मंडळ,भजन मंडळ,भैरवानाथ क्रिकेट क्लब,महिला मंडळ, श्री भैरवनाथ जलयुक्त शिवार कमिटी आदी सामाजिक वाहिन्यांनी भरीव काम केले. या अभियानाचे यश गावचे सरपंच, उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या अमुल्य सहकार्याच्या जोरावर शक्य झाल्याची भावना सरपंच राजाराम दळवी सर यांनी बोलुन दाखविली असल्याची माहिती पत्रकार विकास दळवी यांनी दिली.