स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
सातारा, दि.30 युवक-युवती मतदार यादीच्या नोंदणीच्या कक्षेपासून अद्यापही बाहेर आहेत. त्यामुळे मतदार नोंदणीच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त तरुणांना सहभागी होता यावे, यासाठी २७ ऑक्टोबर २०२३ ते ९ डिसेंबर २०२३ या काळात मतदार नाव नोंदणीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतला असून युवकांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी केले आहे.
तरुणांना मतदानात सहभाग घेता येण्यासाठी त्यांचे नाव मतदार यादीत नोंदण्यासाठी २६२ सातारा विधानसभा मतदार संघातील सर्व महाविद्यालयांतही मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२४ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र युवा मतदारांकडून अर्ज भरून घेणार आहे.
तहसील कार्यालय सातारा, जावळी व उपविभागीय अधिकारी कार्यालय सातारा येथे प्रारूप मतदार यादी भाग क्र. १ ते ४४५ प्रसिद्ध करण्यात आली असून ९ डिसेंबर २०२३ पर्यम दावे व हरकती नोंदविण्यात येणार असून कोणाचे दावे व हरकती असल्यास तहसील कार्यालय सातारा, जावळी तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय सातारा येथे अर्ज सादर करण्यात यावा.