पक्षाची भूमिका पुढे वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही कालही कटिबद्ध होतोआजही आहोत आणि भविष्यातही राहू
- ना.अजितदादा पवार

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —— प्रतिनिधी
मुंबई. दि.०६ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढे वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही कालही कटिबद्ध होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज जनतेला दिला.निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणे स्वीकारत आहोत. या निकालाने आमच्या समोरची जबाबदारी आणखी वाढली आहे,असेही अजितदादा पवार यांनी नमूद केले व निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत आभार व्यक्त केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर आम्ही अतिशय आनंदी आहोत. आयोगाने अत्यंत योग्य वेळी निर्णय देऊन भारतीय लोकशाही सिद्धांतावर शिक्कामोर्तब केले याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी माध्यमांसमोर समाधान व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होताना, राज्यात महायुती सरकारमध्ये सहभागी होताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात आपली भूमिका योग्यरीत्या बजावेल. महाराष्ट्रातील जनतेचा याला मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वासही प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.