महाराष्ट्रसातारासामाजिक

माण तालुक्यात मलवडी येथे ओढा पात्रात घाणीचे साम्राज्य

स्टार ११महाराष्ट्र / प्रतिनिधी अतुल खरात

आंधळी.दि.१६.  माण तालुक्यात मलवडी येथे व्यवसायीकांकडून घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन, जलप्रदूषण झाले आहे.मलवडी दहिवडी हा रस्ता तालुक्याला जाणारा मुख्य रस्ता आहे परंतु या रस्त्याला ओलंडून जात असताना खडकखीरा ही वस्ती लागते.तेथून हा ओढा पावसाळ्यात वाहत असतो.

ओढा पात्रात व्यवसायकांनी केलीली घाण ही अक्षरशः नाक चिमटीत घेऊन पुढे जायला लावते, पण या ओढ्यात,सर्वच हॉटेल व्यवसायाकडून उरलेले, खराब खरकटे अन्न,प्लास्टिक पाणी बॉटल, प्लास्टिक पिशव्या. काचेची बॉटल, चिकन व्यवसायांच्याकडून कोंबड्यांचे सर्व खराब अवयव या ओढ्यात टाकण्यात आले असून,हे पावसाळ्यात तिथून आंधळी नदी पात्रातून धरणात जाते, ही सर्व घाण जलप्रदूषण करत धरणात साठून जल सजीव सृष्ठी धोक्यात आनण्याचे काम करते. हे जर असेच राहिले तर भविष्यात आजार निर्माण होऊन मानवी आयुष्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या सर्व प्रकारच्या प्रदूषणाला व्यवसायिकांचा बेजबादार पणा, धोक्याचा ठरत आहे.परंतु दुर्दैवाची वस्तुस्थिती म्हणजे याकडे कोणाचेच लक्ष्य नाही. मलवडी आरोग्य दक्षता समिती, ग्राम दक्षता समिती व पर्यावरण प्रशासन अधिकारी दुर्लक्ष करून, डोळे झाक करत आहे.यावर संतप्त लोक असे म्हणतं आहेत कि यावरती लवकरात-लवकर निर्णय घेऊन स्वछता करण्यात यावी. व नंतर ओढा पात्रात घाण टाकण्यास नोटीसाद्वारे बंदी घालावी.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!