बामणोली भागात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देणार…आ. शिवेंद्रसिंहराजे;

स्टार११ महाराष्ट्र / कोळघर:प्रतिनिधी
कोळघर.दि.२१.एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी माझे कर्तव्य नेहमीच पार पाडले असून बामणोली भागातील प्रत्येक गावांचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध आहे. माझ्या कारकीर्दीत या ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. वॉटर स्पोर्ट हा सातारा जिल्ह्यातील अतिशय चांगला प्रकल्प शिवसागर जलाशयामध्ये होत असून त्यामुळे साताऱ्याच्या वैभवात अजूनच भर पडणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. काससह बामणोली भागात बारमाही पर्यटन कसे राहील यासाठी मी प्रयत्नशील असून त्यातून रोजगार निर्मितीवर भर देणार आहे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
नाम फाउनेशन, संकल्प प्रतिष्ठान २२ गाव व २२ गाव संघटना कोयना पूर्व विभाग यांच्या नियोजनाने १०५ गाव व्यवस्थापन समिति यांच्या प्रयत्नातून जल नाम प्रकल्प उद्घाटन सोहळा आ. शिवेद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. २२ व २३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये भागातील शेतकऱ्यांचे खुप नुसकान झाले होते. काही शेती वाहुन गेली तर काही ठिकाणी जमीन वाहून गेली या सर्व शेतकरी वर्गाचा विचार करुण परत भागातील शेतकरी उभा राहावा म्हणून जल नाम प्रकल्प नाम फाउंडेशनच्या सहकार्यातून आणी १०५ गाव समाज व्यवस्थापन समिति यांच्या प्रयत्नातून तसेच संकल्प प्रतिष्ठान २२ गाव यांच्या नियोजनातून शेतजमीन दुरुस्तीचा उपक्रम सुरु करण्यात आला. यावेळी सावरी आणि शेंबडी या ठिकाणच्या कामांना सुरुवात करण्यात आली.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, बामणोली हा दुर्गम व डोंगराळ भाग असून या भागात वासोटा किल्ल्याच्या माध्यमातून हजारो पर्यटक वर्षाकाठी येत असतात. मात्र याच पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यासाठी बामणोली भागात जलक्रीडा प्रकल्प मंजूर केला आहे. हा प्रकल्प फक्त जावली तालुक्यासाठी असून यातून रोजगार निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या भागातील मुंबईस्थित तरुण हा पुनश्च गावी स्थायिक होणार आहे. हा प्रकल्प बामणोली, शेंबडी यादरम्यान होणार असून यामध्ये गोवा, केरळ याठिकाणी ज्याप्रकारे बोटिंग व इतर सुविधा आहेत अशाच प्रकारच्या सुविधा या ठिकाणी देखील या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणार आहेत. कोयना धरणाच्या भिंती पासून दहा किलोमीटर अंतर सोडल्यावर वासोटा बामणोली या संपूर्ण परिसरात बोटिंगची अत्याधुनिक सुविधा आता पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
यावेळी नाम फाऊंडेशन चे महाराष्ट्र समन्वयक गणेश थोरात, सातारा समन्वयक बाळासाहेब शिंदे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरचे क्षेत्र संचालक समाधान चव्हाण, यशवंत आगुंडे, सदाभाऊ शिंदकर, धनाजी संकपाळ, राम पवार, राजेंद्र संकपाळ, १०५ गाव समाज संघटनेचे अध्यक्ष घनश्यामदादा सकपाळ, कार्याध्यक्ष डी के जाधव, १०५ गाव व्यवस्थापन समिती मुंबईचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे, संजय मोरे, गणेश उतेकर, समर्थ सातारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीरंग केरेकर, प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठानचे धनाजी शेडगे, लक्ष्मणदादा जाधव, उपाध्यक्ष संजय जाधव, विजयशेठ भोसले, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय शिंदकर,कार्याध्यक्ष के के शेलार,संस्थापक विठ्ठल किर्दत, गजानन कदम,चंद्रकांत शेलार, सचिव विजय जाधव, गणेश कदम, सहसचिव गोविंद शिंदे, सूर्यकांत शिंदे, निलेश शिंदे, लक्ष्मण शिंदे, आनंद शिंदे, बबन कदम, संदीप सावंत, आनंद साळुंखे, यशवंत कदम, अंकुश कदम, संतोष पवार यांच्यासह भागातील ग्रामस्थ, महिला, सरपंच ,उपसरपंच, पोलिस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, मुंबईमंडळातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.



