मेढा.दि.०८. जावळी तालुक्यातील करंजे, सावली, आसणी, भोगवली, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी व वरोशी या आठ गावातील एकूण २१ बंद घरांची केली एकाच मध्यरात्री घरफोडी झाली असून चोर पसार झाले आहेत . मात्र चोरांबे गावांत चोरीचा प्रयत्न फसून गावंच्या सी सी टी व्ही मध्ये कैद झाले आहेत . आज सकाळी सातच्या दरम्यान याची खबर मेढा पोलिसांनाच लाकताच सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी घटना स्थळी भेटी देवून तपास गतिमान केला आसून श्वान पथक बोलवलेआहे.
जावळीत ही एकाच रात्रीत बंद घरांची घरफोडी घडण्याचा प्रकार अनेक वेळा घडला असला तरी एकाच वेळी २१ घरफोड्या होण्याचा मोठी घटना घडली असून पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचा आहे तरच या घरफोड्या थांब तील . सुदैवाने कोठेही अनुचित प्रकार घडला नसला तरी ही टोळी मोठी असणार आहे त्यांनी बंद घरांना लक्ष केले असले तरी त्यांचे टाळे तोडणे घरातील तिजोरी फोडणे त्यातील साहीत्य अस्था व्यस्थ करणे यासाठी त्यांनी अत्याधुनिक साहित्याचा वापर केल्याचा अंदाज आहे .
यामध्ये घरफोडी चोरांनी करंजेमध्ये दोन घरे, सावलीत दोन घरे, आसणीत आठ घरे, भोगवलीत दोन घरे, पुनवडीत एक घर, केडंबेत तीन घरे, वाळंजवाडीत एक घर व वरोशीत एक घर अशी २१ घरे एका रात्रीत फोडून नेली आहेत .
यामध्ये किती कोणाचे नुकसान झाले आहे हे नेमके समजू शकले नसले तरी लाखोचा ऐवज लंपास झाल्याचा अंदाज आहे .
या एकूण वातावरणामुळे पश्चिम जावळीत भितीचे वातावरण झाले आहे .
जावली सहकारी बँकेचे चेअरमन राजाराम ओंबळे रा. केडंबे व नुकतेच सेवानिवृत्त झोलेले पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय किर्दत रा.करंजे यांचीही घरे या घरफोड्यांनी लक्ष केली आहेत .