कुडाळ.दि.१२ . सरताळे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी दस्तगीर शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून संस्थेच्या कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी चेरमन पदासाठी एक अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांनी जाहीर केले.
सरताळे विकास सेवा सोसायटीची गतवर्षीच बिनविरोध निवडणूक पार पडली होती.यामध्ये सर्वप्रथम सौ.राजश्री नवले यांची चेरमन पदी बिनविरोध निवड झाली होती.यावेळी गावपातळीवर झालेल्या निर्णयानुसार त्यांनी आपला एक वर्ष कालावधी पूर्ण झाल्यावर चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने सोसायटीच्या रिक्त पदासाठी सर्व संचालक मंडळाची सभा बोलावण्यात आली होती.
यामध्ये चेअरमन पदासाठी दस्तगीर शेख यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांनी झाल्याचे जाहीर केले.
यावेळी नवनिर्वाचित चेरमन यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पॅनल प्रमुख लक्ष्मण पवार ( बापू )व्हाईस चेअरमन सुनिल भिसे, सरपंच उपसरपंच, तसेच , माजी अध्यक्षा राजश्री नवले, संचालक राजेंद्र पवार ,ईनुस भाई शेख प्रकाश जाधव ,दिनेश गायकवाड , विशाल जाधव सचिन नवले तंटामुक्त अध्यक्ष पिंटू भिसे , मोहन नवले,मोहन काळे,मारूती चव्हाण,श्रीमती बेबी नवले,संजय नवले, अभिजित शेडगे,सोमनाथ पवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.सचिव मनोज देशमाने यांनी सर्वांचे स्वागत व आभार मानले.या निवडीबद्दल चेअरमन दस्तगीर शेख यांचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अभिनंदन केले.