
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——— सुरेश पार्टे
मेढा.दि.०३.संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाचा आरक्षणासाठी एल्गार सुरू असून समाजातील विविध स्तरातून त्याला पाठिंबा मिळत आहे. जावली तालुक्यातील मेढा येथील युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्रान आतार यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाचा आज राजीनामा देऊन मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा जाहीर केला.
आपल्या राजीनामेच्या पत्रात आतार यांनी म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्यातील मराठा समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आरक्षण देणे गरजेचे असून त्यासाठी सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व मागण्या सरकारकडून तात्काळ मान्य कराव्यात यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी तसेच मराठा समाजाला शासनाने तात्काळ आरक्षण जाहीर करावे या मागणी बरोबरच जावली तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने ३१ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आलेल्या बेमुदत साखळी उपोषणास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी मी इम्रान अल्ताफ आतार राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मेढा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे .आपला राजीनामा सदर युवकाने मेढा येथील साखळी उपोषणात जाहिर केला .
यावेळी सुरेश पार्टे, सचिन जवळ , प्रकाश कदम, सचिन करंजेकर, , सुंदर भालेरावनंदकुमार ओंबळे, धनंजय पवार, मधुकर शेलार, संदीप पवार, विनोद वेंदे, महादेव ओंबळे, बाळासाहेब ओंबळे, किरण ओंबळे, बबन ओंबळे ३त्यादी उपस्थीत होते.
मराठ्यांच्या आरक्षणासाठी मुस्लिम युवकाने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याबद्दल सकल मराठा समाजाने त्यांचे आभार मानले आहेत.