
स्टार ११ महाराष्ट्र न्युज —— सुरेश पार्टे
मेढा. दि.०३.जावली तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या बेमुदत साखळी उपोषणास माजी आ. सदाशिवभाऊ सपकाळ यांनी भेट देवून पाठिंबा व्यक्त केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे . या साठी जेव्हा जेव्हा आंदोलने झाली मोर्चे निघाले तेव्हा पासून प्रत्येक मोर्चात व आंदोलनात मी सहभागी असल्याचे माजी आ .सदाशिवभाऊ सपकाळ यांनी सांगीतले.दरम्यान सातारा जि. प. चे माजी शिक्षण सभापती अमितदादा कदम, प्रतापगड कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड . शिवाजीराव मर्देकर, आरपि आय चे किरण बगाडे व त्यांचे सहकारी, वंचित आघाडीचे पदाधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देवून पाठींबा व्यक्त केला.
मेढा येथील बाजार चौकात ३१ ऑक्टोंबर पासून तालुक्याच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना पाठींबसा व्यक्त करण्यासाठी व आरक्षण मागणी साठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे . आजपर्यंत मेढा ग्रामस्थ, कुसुंबी व वेण्णा दक्षिण विभाग ग्रामस्थ, केडंबे ग्रामस्थ, महिला मंडळ मेढा यांनी सेवा बजावली आहे. तर अचानक भजन मंडळ मेढा यांनी आज उपोषण स्थळी भजन सेवा केली.