स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——–
कर्नाटक विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढण्यात यावे, असे विधान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रियांक खर्गे यांनी केले आहे.
मेढा.दि.०९. कर्नाटक विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढण्यात यावे, असे विधान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे यांनी केले आहे. या विधानाच्या निषेधार्थ आज सातारा जिल्हा भाजप उपजिल्हाध्यक्ष विठ्ठल देशपांडे यांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याना सोबत घेऊन जावळी तालुक्याची राजधानी मेढा येथे प्रियांक खर्गे यांचा निषेध व्यक्त केला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे,तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली सावंत, कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष भाईजी गावडे, ओबीसी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ गीता ताई लोखंडे, युवा नेते संतोषजी वारागडे, सदाशिव जवळ, किरण जी ढेबे, श्री प्रविण गाडवे, बाळासाहेब पंडित, धनंजय खटावकर, संतोषजी करंजेकर,आनंद गाडगीळ,अथर्व गाडगीळ, मुकणे ताई ,माजी नगरसेवक विकास देशपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक मेढा या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आदरणीय स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या प्रियांक खर्गे यांच्या बद्दल निषेध व्यक्त करून,”स्वा.सावरकर की अपमान नही सहेगा हिंदुस्थान” अशा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी जावळीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर,व मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले.