सातारासामाजिक

मेढा महावितरणकडून भणंग गावात एक गाव एक दिवस उपक्रम.

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज —— 

मेढा.दि.१८. वीज ग्राहकांचा वीजपुरवठा अधिकाधिक सुरळीत व्हावा यासाठी महावितरणचे प्रयत्न नेहमीच चालू असतात. याच पार्श्वभूमीवर महावितरणच्या मेढा शाखेकडून एक गाव एक दिवस या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात भणंग ता. जावली गावातील विद्युत वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केली.

महावितरणच्या ग्राहकांना वीजपुरवठा अधिकाधिक सुरळीतपणे मिळावा यासाठी महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. याच संकल्पनेतून महावितरण साताराचे अधीक्षक अभियंता अमित बारटक्के, वाई विभागाचे कार्यकारी अभियंता अमित बोकील, मेढ्याचे उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण मेढा शाखेच्या माध्यमातून भणंग ता. जावली गावात या उपक्रमाचे आयोजन सोमवार (ता.१८) रोजी करण्यात आले होते. या उपक्रमादरम्यान भणंग गावाअंतर्गत असणाऱ्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्यांची देखभाल दुरुस्तीची कामे यावेळी कर्मचाऱ्यांनी केली. तसेच यावेळी गावातील विद्युत वाहिन्यांचे वाकलेले पोल सरळ करणे, लूज झालेल्या तारा ओढणे, पोलला ताण देणे, विद्युत वाहिन्यांच्या जवळची झाडे तोडणे, वितरण रोहित्रांची दुरुस्ती करणे तसेच नवीन कनेक्शन देणे व नादुरुस्त असलेले मीटर बदलणे इत्यादि कामे यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी एक गाव एक दिवस उपक्रमादरम्यान केली.
यावेळी या उपक्रमात महावितरणचे शाखा अभियंता सुरेश कुंभार, प्रधान तंत्रज्ञ लीलाधर कारंडे, सूरज जाधव, ओंकार गोळे, महादेव शेलार, संजय पाटणे, तानाजी कदम यांच्यासह एच.व्ही.जी. इलेक्टरीकल्सची टीमने सहभाग घेतला होता.

‘एक गाव, एक दिवस’ या उपक्रमाअंतर्गत भणंग गावातील विद्युत वाहिन्यांची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली. या उपक्रमाचा फायदा ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी होणार असून यापुढील काळात सुद्धा विविध गावात आम्ही हा उपक्रम राबविणार आहोत. या उपक्रमाचे कौतुक गावातील नागरिकांनी सुद्धा केले आहे.

सुरेश अनंत कुंभार,शाखा अभियंता
महावितरण मेढा

 

 

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!