क्राईमसातारा

चोरीचा छडा 24 तासात लावून गव्हाची व तांदळाची पोती हस्तगत

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज —– 
महसूल व पोलीस प्रशासनाने सर्व स्तरातून अभिनंदन
सातारा दि.१८.   तहसिल सातारा यांचे नागठाणे येथील गोदामातून दि. 13 डिसेंबर 2023 चे मध्ये रात्री काही बोरट्यांनी खिडकीची लोखंडी जाळी कापून गोदामामध्ये प्रवेश करून प्रत्येकी 50 किलो वजनाची 6 गव्हाची व 1 तांदळाचे पोते चोरून नेले.
गोदामपाल निलेश जाधव यांच्या सकाळी निदर्शनास येताच त्यांनी वरिष्ठ अधिकारी तहसिलदार राजेश जाधव व जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना कळविले. दोन्ही अधिकाऱ्यांनी नागठाणे गोदामामध्ये भेट देवून पाहणी केली.
गोदामपाल यांनी बोरगांव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. महसुल प्रशासनाने वेगाने हालचाली करत रात्रभर काम करून नागठाणे गोदामच्या लोखंडी जाळ्या रातोरात्र बदल्या तर पोलिस प्रशासनाने 24 तासात चोरीचा शोध लावत चोरीचा सर्व माल हस्तगत करत 6 जणांना ताब्यात घेतले.
महसुल आणि पोलिस प्रशासनाने अवघ्या एका रात्रीत गोडाउनची डागडुजी करणे व चोरीचा छडा लावून सर्व मुद्दे मालासह चोरांना पकडल्या वाचत समाजातील सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!