राजकीयसातारा

केंद्रीय मंत्री आठवले साहेबांनी केले खटाव तालुकाध्यक्ष कृणाल गडांकुश यांचे कौतुक

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——(अजित जगताप)

सातारा दि.०३. रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष व सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या मातोश्री सरूबाई वामन गायकवाड यांचे दुःखद निधन झाले होते. त्यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे पसरणी ता. वाई येथे आले होते. त्यांनी अशोक बापू गायकवाड यांचे सांत्वन केले तसेच पुण्याला जात असताना खटाव तालुक्यामध्ये रोजगार उद्योजकता मेळावा आयोजित करून अनेकांना रोजगार उपलब्ध केल्या. त्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश यांचे कौतुक करून आपण केलेल्या विधायक कार्यक्रमाने पक्षाची प्रतिमा उजळले आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

पसरणी ता.वाई येथे केंद्रीय मंत्री आठवले साहेब कुणाल गडांकुश यांचे कौतुक करताना

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वडूज खटाव या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने वडूज नगरीमध्ये भव्य विविध मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योग जगत मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला गौरवित यश आलेला असून दीडशे बेरोजगार युवकांना रोजगार मिळाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश यांनी दिली आहे.

या मेळाव्याला भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम ,समाज कल्याण आयुक्त सातारा नितीन उबाळे, भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वैभव माने, रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, माजी समाज कल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळेला वडूज नगरीमध्ये खटाव तालुक्यातील ८५ गावातील अनेक बेरोजगार युवक तसेच कुशल- अकुशल कारागीर या मेळाव्याला उपस्थित राहिले होते. प्रारंभी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा खादी ग्रामोद्योग केंद्र, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट, जिल्हा कौशल्य विकास रोजगार, पंतप्रधान उद्योग निर्मिती, मुख्यमंत्री उद्योग निर्मिती याची सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली .

या मेळाव्याला आलेल्या युवकांना ऑन द स्पॉट नियुक्ती पत्र देण्यात आले. सदरच्या मेळाव्याचे उद्घाघाटन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष व सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी केले. या मेळाव्याला मदत फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रभारी माण तालुका अध्यक्ष मयूर बनसोडे, खटाव तालुकाध्यक्ष कुणाल गडांकुश, सरचिटणीस संतोष भंडारे, अनिता तोरणे ,अजित नलावडे, अजित कंठे ,आकाश खांडेकर, अमर झोडगे, शिवाजी तिडके, प्रकाश शेळके, नाथा कंठे ,सुरेश कोकाटे ,विकी शिंदे, रोशन जाधव, सचिन सुतार, प्रफुल ओव्हाळ, अविराज जाधव यांच्यासह सर्व समाजातील होतकरू उद्योजक व कुशल कारागीर उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!