स्टार 11 महाराष्ट्र न्युज ——-
दि.03. जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथे ३ जानेवारी २०२४ रोजी,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी उपस्थित होते. सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य गिरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी अनमोल मार्गदर्शन केले.
आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य गिरी म्हणाले,तत्कालीन काळात पुण्यासारख्या कर्मठ विचारसरणी असलेल्या शहरात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु करून क्रांतिकारी पाऊल उचलले. त्यावेळी तेथील कर्मठ वृत्तीच्या लोकांनी सावित्रीबाई फुले यांना नाहक त्रास दिला. परंतू त्यांनी तो त्रास सहन करत शिक्षणाचे घेतलेले व्रत पूर्ण केले. म्हणूनच आज मुली व महिला शिक्षण घेत असून,वरिष्ठ पदावर विराजमान झाल्या आहेत. त्यांच्या या कार्याचा वारसा आपण इथून पुढे चालवणे हीच सावित्रीबाई फुले यांना खरी आदरांजली ठरेल असे सांगून त्यांनी,आपले अनुभव व्यक्त करीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख करून देताना ते पुढे म्हणाले ” स्त्रीला एक स्त्री म्हणून वेगवेगळ्या भूमिका व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात असे सांगून प्रत्येक स्त्रीने व मुलींनी ध्येय, जिध्द, चिकाटी यांच्या जोरावर अडचणींवर मात केली पाहिजे असा सल्ला उपस्थित विद्यार्थिनींना दिला. प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी शुभेछ्या दिल्या.
सुरुवातीस प्रा.डॉ.संजय भोसले यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी – विध्यार्थिनी बहुसंख्येने उवस्थित होते. प्रा. प्रमोद चव्हाण यांनी आभार मानले.