स्टार ११ महाराष्ट्र न्यूज —— अजित जगताप सातारा
वडूज दि.१३. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत वडूज शहर पाणीपुरवठा योजना मंजूर झाले असून आज सायंकाळी भाजपचे लोकप्रिय खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व माण -खटावचे जलनायक आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर ,भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण व वडूज नगराध्यक्ष मनीषा काळे , खटावचे तहसीलदार बाई माने व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या योजनेचे भूमिपूजन दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. या वेळेला विविध पक्षाचे नगरसेवक सुद्धा उपस्थित असल्याने विकास कामासाठी वडूजकर राजकारण विसरतात हे अधोरेखित झालेले आहे.
आज वडूज नगरपंचायतीच्या बाजार पट अंगणात झालेल्या या कार्यक्रमांमध्ये सुमारे ३० वर्षाचा लोकसंख्येचा अंदाज घेऊन ही योजना कार्यान्वित केली आहे . येरळवाडी धरणातून प्रकल्प व्यवस्थापन मानव सेवा कन्सल्टंट, धुळे व ठेकेदार सुरजकुमार शिवाजी मचाले यांनी हे काम घेतलेले आहे. त्यामुळे त्यांचाही या वेळेला सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने वडूज नगरपंचायतीने विकास कामे करून दाखवून विरोधकांना चित्रपट केले आहे.
नगरसेविका सौ रेखा बनसोडे, काँग्रेस नगरसेवक अभयकुमार देशमुख व भाजप नगरसेवक जयवंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर या योजनेबाबत वडूज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला सर्व मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजप गटात सामील झालेल्या वडूज नगरपंचायतीच्या नगरसेविकांचे यथोचित सत्कार घडवून आणला .एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शह देण्यास वडूज नगरीची भाजप यशस्वी ठरल्याची चर्चा सुरू झालेली आहे. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. संपूर्ण वडूज शहरांमध्ये फलकबाजी करून या कार्यक्रमाची वातावरण निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे व नगराध्यक्ष मनीषा काळे यांचा उत्साह वाढलेला दिसून आला. या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने महिलांचा नगरसेविकांचा गौरव करताना या सर्व नगरसेविका विचारपीठावर बसल्या होत्या. तर त्यांचे पतीराज हे विचार पिठाच्या एका बाजूला शांतपणाने एका बाजूला उभे असल्याचे अनेकांनी पाहिले. त्यामुळे खऱ्या अर्थाने नारी शक्ती भाजपने यशस्वी करून दाखवली आहे. असं म्हणण्यास वाव मिळालेला आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपंचायतीचे सेवक प्रसाद जगदाळे व निवेदक चंद्रकांत कोकाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपचे नेते अनिल माळी, सोमनाथ जाधव, ओमकार चव्हाण व असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी तसेच युवराज पाटील, नितीन बर्गे, रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश ,सुरज पोतदार, अमोल गोडसे व समर्थक यांनी परिश्रम घेतले.