
स्टार ११ महाराष्ट्र न्युज——
मेढा.दि.०४. जावली तालुक्यात अनेक भागातून गौण खनिज सह वाळूचे उत्खनन सुरूआहे. यावर ठोस उपाय म्हणून वाळू उपसा,गौण खनिजांची चोरी व वाहतूक करीत आहेत अश्या ठिकाणी कारवाई करत तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी तीन जेसीबी व दोन ट्रॅक्टर जप्त केली.
जावळीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी गौण खनिजाच्या वाहतुकीवर लक्ष ठेऊन होते. इंदवली तर्फ कुडाळ,आर्डे, व इतर ठिकाणाहून कारवाई करून तीन जेसीबी व दोन ट्रॅक्टर अशी वाहने जप्त केले आहेत,ही वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात आणून जमा करण्यात आली असून एकावर सात लाखांहून अधिकचा दंड ठोठावला आहे,तर इतर वाहनांवर अद्याप कारवाई प्रस्तावित असून पुढील दंडाची प्रक्रिया सुरू आहे, या कारवाईमुळे महसूल विभागाला दंडाच्या माध्यमातून लाखो रुपये महसूल मिळणार आहे.त्यामुळे अवैध कारभार चालविणारे यांना मोठा धक्का बसला आहे.
उप विभागीय अधिकारी दादासाहेब दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अनधिकृत गौणखणीज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी ज्या मार्गांनी गौण खनिजाची वाहतूक होते.अशा मार्गांवर आपले अधिकारी कर्मचाऱ्यांची 24 तास भरारी पथके स्थापन करून विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक अथवा उत्खनन केले तर कडक कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी दिला आहे.