स्टार ११ महाराष्ट्र न्यूज —-
मेढा.दि.०४. मेढा त. जावली येथील जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील आदित्य जवळ (बीएससी भाग एक) रोहन शेलार (बीएससी भाग एक) व प्रथमेश यादव (बीएससी भाग दोन ) यांची भारतीय सैन्य दलात विविध पदांवर निवड झाली त्या प्रित्यर्थमहाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांची शुभ हस्ते या तिन्ही विद्यार्थ्यांचा नुकताच गौरव करण्यात आला.
यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाडगे व जिमखाना विभाग प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण हे उपस्थित होते, या तिन्ही विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलातील निवड म्हणजे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाच्या नावलौकिकात भर असून, महाविद्यालयाच्या शिरपेचात यांनी तुरा रोवला आहे .या तिघांचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा व देशसेवेच्या विविध कार्यात स्वयंस्फूर्तीने भरती व्हावे ” असे प्रतिपादन प्राचार्य यांनी केले. ते पुढे म्हणाले ” महाविद्यालयाच्या स्थापनेपासून जावळी खोऱ्यातील मुला-मुलींचे शिक्षणाची व्यवस्था झाल्याने इथे शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी मागील २० वर्षात विविध क्षेत्रात यश संपादन केले आहे.मा.आमदार शशिकांत शिंदे साहेब व सन्माननीय सचिव सौ.वैशाली शिंदे यांच्या कुशल नेतृत्वाखाली सर्व विश्वस्त मंडळ प्राध्यापक व विद्यार्थी यांनी आजवर जी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्याचेच हे फलित आहे ”
आदित्य जवळ रोहन शेलार व प्रथमेश यादव यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा .आमदार शशिकांत शिंदे, सचिव सौ.वैशाली शिंदे ,सर्व विश्वस्त, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.