स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
मेढा.दि.२६.आध्यात्मिक आणि साहित्यिक ज्ञानसंपदेचा गौरव करण्यासाठी ह.भ.प. प्रविण महाराज शेलार यांना कै.अंकुश जगन्नाथ चव्हाण सामाजिक प्रतिष्ठान भक्तवडी, ता. कोरेगांव,जि.सातारा यांच्या वतीने कै.अंकुश जगन्नाथ चव्हाण किर्तन गौरव पुरस्कार २०२४ आणि मानपत्र देऊन कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष आ.महेश शिंदे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
कै.अंकुश जगन्नाथ चव्हाण यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माज़ी जिल्हा परिषद सदस्य राहुल बरगे,भाजपा कोरेगाव तालुक़ा अध्यक्ष-संतोष जाधव,ह.भ.प. आजाद महाराज गुजर,प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप जयदीप महाराज चव्हाण उपस्थित होते.
ह.भ.प. प्रविण महाराज शेलार श्री विठ्ठलधाम प्रतिपंढरपुर क्षेत्र आंबेघर (मेढा) यांनी २००१ सालापासून कीर्तन व प्रवचन सेवेला प्रारंभ केला. आपल्या आंबेघर गावी २००७ साली महाराष्ट्रातील पहिली विनामूल्य तत्वावर गुरुकुल श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था नावाने वारकरी शाळा सुरू केली. त्या माध्यमातून महाराष्ट्राला कीर्तनकार, मृदंगंवादक, गायक व व्यसनमुक्त सुसंस्कृत व सदाचारी तरुण दिले. शेकडो मुलांना व्यवसायिक मार्गदर्शन करुन व्यवसायात उभे करत आहात.
महाराष्ट्रातील पहिलीच वारकरी सहकारी पतसंस्था चालू करुन सर्वसामान्य लोकांच्या छोट्या-मोठ्या गरजा भागविण्याचा प्रयत्न केला असून जन्मगावी क्षेत्र आंबेघर येथे श्री विठ्ठलधाम प्रतिपंढरपुर निर्माण केले. त्यामुळे प्रत्येक एकादशीला जावली तालुक्यासह अनेक ठिकाणाहून हजारो भाविक दर्शन व प्रसादाचा लाभ घेवु लागले. सध्या गुरूकुल मधे शेकडो गरजू व होतकरु मूले वारकरी शिक्षणासह शालेय शिक्षण घेत आहेत. आंबेघर येथे भारत देशातील सर्वात उंच ५१ फुट विठ्ठल मूर्ति उभारण्याचा प्रविण महाराज यांनी संकल्प करून मुर्तीच्या कामास सुरुवात केली आहे.