सातारासामाजिक

जन्नीदेवी मातेचा वर्धापन दिन सोहळा दर्शनाचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांचे आवाहन

 

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——-

कुसुंबी.दि.१२. प्रतिनिधी संजय वांगडे    कृषी प्रधान पिंपरी ता.जावली. जि. सातारा येथील जननी मातेचा मंदिराचा दहावा वर्धापन दिन सोहळा दिनांक १४ आणि १५ मे रोजी संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी तालुक्यातील भाविक भक्तांना दर्शनाचा लाभ घेण्यासाठी पिंपरी ग्रामस्थांनी आवाहन केले आहे

या दोन दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दिनांक १४ मे रोजी सायंकाळी सहा ते सात या वेळेत विश्वंभर बाबा अध्यात्मिक शिक्षण संस्था यांचा प्रवचनाचा तसेच हरीपाठाचा कार्यक्रम होईल रात्री सात ते नऊ या वेळेत ह भ प अतुल महाराज देशमुख गांजे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यावर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेता येईल.

 

१४/१५ मे रोजी पिंपरीच्या जन्नीदेवी मातेचा वर्धापन दिन सोहळा,                                          सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी पिंपरी ग्रामस्थांचे आवाहन…

 

बुधवार दिनांक १५ मे रोजी सकाळी सात ते नऊ या वेळेत देवीचा रुद्र अभिषेक केला जाईल अभिषेक झाल्यावर सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे यानंतर अकरा ते एक दरम्यान काल्याचे किर्तन ह. भ. प. दिपेश महाराज जाधव खेड यांची कीर्तन सेवा होईल. दुपारी दीड ते तीन या वेळेत पिंपरी गावातून दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन ते चार या वेळेत मान्यवरांचे स्वागत केले जाईल स्वागत समारंभानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्यात येईल.

या सोहळ्यासाठी ग्रामस्थ मंडळ पिंपरी, नवजवान तरुण मंडळ पिंपरी, शिवप्रेमी मित्र समूह पिंपरी, जननी माता विकास फंड मुंबई यांचे मोलाचे सहकार्य लाभते.

 

 

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!