
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
केळघर .दि.१२.”आदर्श शिक्षिका कै.सौ.मंदाकिनी तुकाराम ओंबळे यांचे अध्यापन व सामाजिक क्षेत्रातील कार्य विद्यार्थी- शिक्षकांना प्रेरणादायक आहे.” असे प्रतिपादन यशोधन ट्रस्टचे अध्यक्ष व प्रसिद्ध वृद्ध सेवक रवी बोडके यांनी नुकतेच केडंबे ता. जावली येथे बोलताना केले. ते प्रा. तुकाराम ओंबळे द्वारा प्रायोजित व जनसेवा प्रतिष्ठान केडंबे द्वारा आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील व आदर्श शिक्षिका कै.सौ.मंदाकिनी तुकाराम ओंबळे यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त आदर्श शिक्षिका कै. सौ. मंदाकिनी तुकाराम ओंबळे स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक आनंदराव म्हस्कर होते.
याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक संतू मस्कर, तालुका शिवसेनाप्रमुख संतोष चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष बाजीराव धनावडे, ग्राम विकास अधिकारी बाळासाहेब चव्हाण,बाळासाहेब शिर्के, सचिन शेलार ग्राम पंचायत सदस्या सौ.अनिता ओंबळे व सौ. लोहार इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून रवी बोडके म्हणाले की आई वडिलांच्य पेक्षा धनदौलत आणि वैभव यांना काडीचीही किंमत नाही. म्हणून आपल्या मुलांवर आई-वडिलांची सेवा करण्याचे संस्कार बालपणापासूनच व्हायला हवेत.आनंदराव मस्कर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले,की युवक व विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील संत गाडगे महाराज इत्यादी महापुरुषांची चरित्रे वाचून त्यांचे जीवन कार्य व विचार आत्मसात करावेत. त्यातूनच आपणास जगण्यासाठी बळ मिळेल.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जावली बँकेचे मा. चेअरमन राजाराम शेठ ओंबळे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष एकनाथ ओंबळे यशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी बोडके, प्रकाश लोखंडे, राजेंद्र शेठ धनवडे व मोहन जगताप या मान्यवरांचा आदर्श शिक्षिका कै. सौ. मंदाकिनी तुकाराम ओंबळे आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक श्री विलास कारंडे,सुरेश मारुति मोरे, सौ. दिपाली गणेशकुमार कुंभार व व्ही व्ही साळुंखे यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. तर कुमार विघ्नेश केशव ओंबळे, कु. श्रुती आत्माराम ओंबळेव कु. श्रद्धा प्रवीण ओंबळे यांना गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले.
प्रारंभी छ. शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, शहीद तुकाराम ओंबळे व कै.सौ. मंदाकिनी तुकाराम ओंबळे यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना उपस्थितांनी आदरांजली वाहिली.जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक एकनाथ ओंबळे यांनी प्रास्ताविक भाषण केले. संदीप धनवडे, दत्ता ओंबळे व जनसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. संदीप धनावडे यांनी सूत्र संचालन केले.दत्ता ओंबळे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला पैलवान गणपत ओंबळे, माझी बँक अधिकारी चंद्रकांत ओंबळे, केंद्रप्रमुख मधुकर धनवडे, तलाठी पांडुरंग ओंबळे, मा.ग्रा.पं.स. प्रकाश ओंबळे तसेच सर्जेराव लोहार यांच्यासह महिला, पुरुष-ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्या मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.