सातारासामाजिक

भजनी मंडळांसाठी भव्य ‘जिल्हा भजन महोत्सव’ आयोजित करणार

आ. शिवेंद्रसिंहराजे; भजन स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

स्टार ११ महाराष्ट्र न्युज. ——— 
सातारा.दि .१७. भजन हि आपल्या ग्रामीण भागातील लोककला आहे. अगदी लहान मुलांपासून ते ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत भजन मंडळात आपली कला सादर करणारे अनेक कलाकार आहेत. भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण सातारा आणि जावली तालुक्यातील भजनी मंडळांना व्यासपीठ मिळावे म्हणून वेगवेगळी भजन स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात भजनी मंडळ आहे. भजन हि लोककला जोमाने वाढावी, मंडळांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आगामी काळात सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा भजन महोत्सव घेण्याचे नियोजन केले जाईल, असा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सातारा तालुक्यातील भजनी मंडळांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ५० भजनी मंडळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, राजू भोसले, सरिता इंदलकर, राहुल शिंदे, धनाजी शेडगे, अविनाश कदम, उत्तमराव नावडकर, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार, संचालक विजय पोतेकर, अरुण कापसे, राजू नलावडे, संजय पवार, राजेंद्र यादव, प्रथमेश जाधव, धीरज शेलार, बापुसो गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत प्रथम क्रमांक एकमित्र भजन मंडळ पेटेश्वरनगर आणि माउली भजन मंडळ शिंदेवाडी यांच्यात विभागून देण्यात आला. दोन्ही मंडळांना विभागून रोख २१,१११ रुपये बक्षीस, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. हरे कृष्ण भजन मंडळ कुशी यांनी द्वितीय क्रमांकाचे १५१११ रुपये बक्षीस पटकावले तर, तृतीय क्रमांकाचे ११,१११ रुपये बक्षीस जोतिर्लिंग भजन मंडळ खोडद यांना मिळाले. उत्तेजनार्थ प्रत्येकी ५ हजार रुपयांचे बक्षीस माउली भजन मंडळ सातारा आणि हरिप्रिया भजन मंडळ कोंडवे यांना मिळाले. उत्कृष्ट गायक म्हणून संजय शिंदे सोनगाव, उत्कृष्ट तबला वादक म्हणून अजय गायकवाड आणि उत्कृष्ट मृदंग वादक म्हणून श्रीकांत माने याना प्रत्येकी २५०१ रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक मृदंगाचार्य संगीतविशारद मदनराव कदम आणि भजनसम्राट संगीतविशारद किरण भोसले यांचाही सन्मान करण्यात आला. स्पर्धेत सहभागी प्रत्येक मंडळाला सन्मानचिन्ह आणि ५०० रुपये प्रवासभाडे देण्यात आले. सर्वांची नाश्ता आणि भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, ह.भ.प. संभाजी शेळके, आप्पा महाराज आसनगावकर, नवनाथ चव्हाण, विजय शेळके, गणपत पोतेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!