
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
केळघर.दि१७. मौजे शिवाजीवाडी, भोगवली येथे श्री गणेश मंदीर प्रथम वर्धापन दिन दिनांक ११ मे व १२ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ११ मे या दिवशी दिंडी सोहळ्याचे व लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रात्री ९ वाजता सुप्रसिद्ध किर्तनकार व व्याख्याते ह. भ. प. सागर पवार महाराज यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज- एक प्रेरणास्रोत’या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. रात्री ११ वाजता सुस्वर भजनाचा कार्यक्रम झाला.दिनांक १२ मे रोजी ग्राम दैवत श्री आशिलमाल देवाला अभिषेक करण्यात आला. श्री गणेश मंदीर शिवाजीवाडी या ठिकाणी श्री गणेश मुर्ती अभिषेक व सत्यनारायण महापूेचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर आलेल्या भक्त जनांचे स्वागत व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थिती दाखवून ग्रामस्थांना प्रथम वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सोबत सातारा जिल्हा मध्य. बॅंकेचे संचालक सन्मान श्री रांजणे साहेब,रामभाऊ शेलार,उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गणेश मित्र मंडळ शिवाजीवाडी, मुंबई;ग्रामस्थ मंडळ शिवाजीवाडी व महिला मंडळ शिवाजीवाडी,ग्रामस्थ मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.