सातारासामाजिक

ई – करार नोंदिसाठी सरकारी बाबुंची शेतकऱ्यांकडून लूट

जावली तालुक्यातील प्रकार

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——– दिलीप पाडळे पाचगणी 

करहर.दि.३०.  एकीकडे शेतकरी हवामानाच्या बदलाने अडचणीत असताना उत्पादित मालाला बाजारपेठेत भाव मिळत नाही. यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. यातच चालू हंगामातील बियाण्यांसाठी विकास सोसायट्याकडून कर्ज मंजुरीसाठी महसूल विभागाकडे ई करार नोंदीसाठी महसुलच्या सरकारी बाबुंकडून शेतकऱ्यांची लूट चालू असल्याने जावली तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

जावळी तालुक्यात चालू वर्षाच्या शेतीच्या खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. गाव पातळीवरील सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करीत असतात. त्याची ई करार ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांची सर्रास ठिकाणी अडवणूक करीत आर्थिक लूट केली जात आहे.

या बाबतची सविस्तर माहिती अशी की, शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्वी सोसायट्यांचे माध्यमातून पीक पाणी कर्ज देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. त्याचे ई – करार ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सेतू कार्यालयातून केली जाते. याकरिता नाममात्र ५० रुपये शुल्क आकारले जात असताना सनपाने येथील तलाठी कार्यालयात मात्र प्रती नोंदणी ५०० रुपये घेतले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

सनपाने, (ता. जावळी) येथील गावकामगार तलाठयाने सोसायटीतून आलेल्या शेतकी कर्ज ऑनलाईन ई करार नोंद करणेकामी सनपाने येथील दोन शेतकऱ्यांची अडवून हजार रुपयांना लुटले. याबाबत महसूल विभागाने संबंधित तलठ्याची चौकशी करून शेतकऱ्यांकडून लुटलेले पैसे तातडीने त्या शेतकऱ्यांना द्यावेत. आणि त्यांचेवर योग्य टी कारवाई व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

प्रतिक्रिया —-

माझ्या घरातील भावजय सुरेखा शंकर नारणे,व पुतण्या सुहास शंकर नारणे.यांनी सनपाने विकास सेवा सोसायटी माध्यमातून पीक कर्ज प्रक्रिया केली असून त्यांनी ऑनलाईन ई -करार नोंद करण्याकरिता मी स्वतः तलाठी यांच्याकडे गेलो असता. या नोंदी करिता उतारे लागत आहेत म्हणून दोन्ही ई करार नोंदीचे प्रत्येकी पाचशे असे हजार रुपये घेतले आहेत..

धर्मु मारुती नारणे.
शेतकरी सनपाने तालुका जावळी.

 

प्रतिक्रिया – 

सोसायटी माध्यमातून सध्या शेतकऱ्यांची पीक कर्ज प्रक्रिया पुर्ण करण्याकरिता त्यांनी ऑनलाईन ई -करार नोंद गरजेची असते. सेतू मधून ही नोंद ५० रुपयात होते. सदर तलाठी यांना या बाबत विचारणा केली मात्र त्यांनी अरेरवीची उद्दट भाषा करीत आमच्या कामामध्ये ढवळाढवळ करू नका असे बोलून फोन कट केला.

रामदास पार्टे,

सचिव सनपाने,विकास सेवा सोसायटी.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!