सातारासामाजिक

जयहिंद फाउंडेशन कडून शहीद सैनिक परिवार सन्मान

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——- प्रतिनिधी : संजय वांगडे.

कुसुंबी.दि.३०.जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने साताऱ्यातील शाहू कलामंदिर येथे शनिवार, दि. १ जून रोजी सकाळी १० वाजता शहीद सैनिक परिवार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जय हिंद फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली.

 

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, ठाणेचे महसूल उपायुक्त नासीर मणेर, सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक लेफ्टनंट कर्नल राजेंद्रकुमार जाधव, सुभेदार मेजर सतीश तपसे, वीरमाता अनुराधा गोरे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने, उपाध्यक्ष अनिल अनपट व सचिव हनुमंत मांढरे तसेच जय हिंद फाउंडेशनचे जावली तालुका अध्यक्ष रवी दादा कदम यांच्याकडून करण्यात आले या कार्यक्रमासाठी शूरवीरांचा जावली तालुक्यातून समस्त नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!