सातारासामाजिक

सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट,नागरिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
सातारा दि. ८.हवामान विभागाने सातारा जिल्ह्यामध्ये  दि. ८ ते ९ जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे.
जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस सुरू आहे.पश्चिम भागात पावसाचा जोर कमी आहे. हवामान विभागाने दि. ८ आणि ९ जुलै रोजी सातारा जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. विशेषता करुन जिल्ह्याच्या पश्चिम भागात घाट क्षेत्रात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनानेही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. काही भागात दरडी कोसळतात, झाडे पडतात. दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. व स्वत:हुन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये.नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे.
  • प्रशासनाने नागरिकांस केले आवाहन ……
  • पर्यटनस्थळे, धबधबे, धरण परिसर,आदी ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव जायचे टाळावे.
  • नदी,ओढे नाल्यावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.
  • पाऊस पडताना विज चमकत असताना  झाडाखाली आश्रय आणि मोबाईलचा वापर करू नका.
  • प्रवास करताना कोणत्याही घाटात  विनाकारण थांबू नका .
  • अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका आणि कोणीही अफवाही पसरवू नका.
०००००

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!