स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–
मेढा.दि.०९ जावली तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेची परंपरा कायम राखत चालू वर्षी सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षातही जि.प.केंद्र शाळा केळघर ता .जावली येथील श्लोक संदीप गाडवे हा विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २४० गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक झाला.तसेच शिवम बेलोशे ,शिवांजली बेलोशे,स्वरूप नेवसे,स्वराली नेवसे,अनय धनावडे व संभव जवळ असे इतर सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले.
त्यासाठी त्याला वर्गशिक्षक श्री . दिपक गायकवाड , सौ शोभा धनावडे व सौ सुचित्रा नेवसे यांनी मार्गदर्शन केले .
आय विनर या स्पर्धा परिक्षेतही इ. दुसरीतील श्रीतेज अनिल बेलोशे याने जिल्हा स्तर प्रथम क्रमांक पटकावला .
गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ , विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे ,माजी विस्तारअधिकारी कल्पना तोडरमल , केंद्रप्रमुख हंबीरराव जगताप , शाळा व्यवस्थापन समिती ,मुख्याध्यापक , शिक्षक वृंद ,ग्रामस्थ यांनी शाळेचे अभिनंदन केले .
विद्यार्थी श्लोक गाडवे चा सत्कार करताना हंबीरराव जगताप. समवेत दीपक गायकवाड, शोभा धनावडे, सुचित्रा नेवसे .आदी