जिल्हाधिकारी सातारासातारा

आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी व ग्रामस्थांमध्ये एकत्रित बैठक संपन्न

सोनगाव येथील नियोजित कचरा डेपो बाबत आमदार शिवेंद्रसिंहराजेंची शिष्टाई

सातारा.प्रतिनीधी.जावळी तालुक्यातील मेढा नगरपंचायतीचा कचरा डेपो सोनगाव येथे नियोजित करण्यात आला होता या कचरा डेपोला ग्रामस्थांचा प्रखर विरोध होता. त्यामुळे सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी चर्चा करून या ठिकाणचा कचरा डेपो इतरत्र हलवण्याबाबत सूचना केल्या. व अखेर ही शिष्टाई यशस्वी झाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की मेढा नगरपंचायतीचा कचरा डेपो सोनगाव हद्दीमध्ये नियोजित करण्यात आला होता. त्यानुसार जागा ठरवण्यात आली होती. मात्र या ठिकाणच्या कचरा डेपोस सोनगाव ग्रामस्थांचा गेले आठ दिवसांपासून प्रखर विरोध होता. याबाबत सोनगाव ग्रामस्थांनी जयदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील सादर केले होते.

दरम्यान यावर आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ग्रामस्थ व जिल्हाधिकारी यांची एकत्रित बैठक बुधवारी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोनगाव ग्रामस्थांचा या कचरा डेपोस विरोध असून या कचरा डेपोचा येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल तरी हा कचरा डेपो सोनगाव व्यतिरिक्त इतर मोकळ्या नागरी वस्ती पासून दूर असणाऱ्या ठिकाणी हलवण्यात यावा व त्याबाबतच्या सूचना व्हाव्यात अशी मागणी केली. त्यानुसार मालदेव खिंड तसेच मेढा शहराजवळील काही शासकीय जागा यावेळी सुचवण्यात आल्या,व त्यापैकी एक जागा निवडून मेढ्याचा कचरा डेपोचा विषय सोडवण्यात यावा.अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मेढा मुख्यकार्यकारी अधिकारी यांना जागेची पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी जयदिप शिंदे ,प्रतापगड चेअरमन सौरभ बाबा शिंदे, व्हाईस चेअरमन एडवोकेट शिवाजीराव मर्ढेकर ,सुरेश चिकणे,नारायण पाटील,जगन्नाथ पिसाळ,अनिकेत निगडे, संतोष शिंदे , दत्ता चिकणे , युवराज शिंदे, जितेंद्र चिकणे,सुनिल सोनवणे, विश्वनाथ शिंदे,उमेश काटकर,अमित चिकणे,उमेश शिंदे,रोहित मोरे , अजित निगडे, बबन किर्वे.ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!